हेच का तुमचं हिंदुत्व? सुषमा अंधारेंविरोधात मराठा युवा सेनेकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी; उद्धव ठाकरेंवरही निशाणा

Sushma Andhare News: मराठा युवा सेनेकडून शिवसेना भवन, दादर परिसर तसेच चेंबूरमध्ये उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारेंच्या विरोधात बॅनर झळकवण्यात आले आहेत.
Sushma Andhare  News
Sushma Andhare Newsनिवृत्ती बाबर

निवृत्ती बाबर, मुंबई

Sushma Andhare Latest News: मुंबईतून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावरोधात जोरादार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मराठा युवा सेनेकडून शिवसेना भवन, दादर परिसर तसेच चेंबूरमध्ये उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारेंच्या विरोधात बॅनर झळकवण्यात आले आहेत. हेच का तुमचं हिंदुत्व? असे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

Sushma Andhare  News
Car Accident News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कारला भीषण अपघात; पाच जण जागीच ठार, तीन गंभीर जखमी

आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेल्या सुषमा अंधारे यांनी यापूर्वी अनेक भाषणांमधून आपले विचार मांडले आहेत. राम आणि कृष्ण धोतांड आहे, मी राम आणि कृष्णाला मानणार नाही. ज्याच्या घरात लेकरू झालं त्यालाच माहित नाही शंकर किती भोळा आहे. अशाप्रकारची वक्तव्य सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत यायच्या अगोदर केली होती असा आरोप मराठा युवा सेनेने केला आहे.

Sushma Andhare  News
Bharat Jodo Yatra: राहुल गांंधींना मोठा धक्का! सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ठाण्यात गुन्हा दाखल

हिंदू देवांचा अपमान करणारी व्यक्ती सेने, मग हेच का तुमचं हिंदुत्व? असा सवाल बॅनर लावून विचारण्यात आला आहे. सुषमा अंधारे यांचा लावरे तो विडिओ म्हणत आज 11.30 ला पोलखोल पत्रकार परिषदचे आयोजन मराठा क्रांती युवा मोर्चा तर्फे करण्यात आलं आहे. तसेच दादर पोलीस स्थानकात सुषमा अंधारे यांच्या विरोधात मराठा क्रांती युवा मोर्चा कडून तक्रार दाखल करण्यात येणार आहे

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com