- अजित पवार
- अजित पवार- Saam TV

अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घरी २४ तासांनंतरही इन्कमटॅक्सची कारवाई सुरु

पवार कुटुंबीयांशी संबंधित ज्या ठिकाणांवर काल इनकम टॅक्स विभागाने छापे टाकले तिथे आजही छापेमारी सुरु आहे

पुणे : पवार कुटुंबीयांशी संबंधित ज्या ठिकाणांवर काल प्राप्तीकर विभागाने Income Tax Department छापे टाकले तिथे आजही छापेमारी सुरु आहे. रात्रभर प्राप्तीकर विभागाचे अधिकारी आणि त्यांना सुरक्षा पुरवणारे केंद्रीय सुरक्षा पथकांचे जवान छाप्याच्या ठिकाणीच मुक्कामाला आहेत. IT Raids on Pawar Family residence still on

अजित पवारांच्या Ajit Pawar पुण्यातील दोन बहिणी डॉक्टर रजनीताई इंदुलकर आणि नीताताई पाटील, पुणे Pune जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका आणि सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर , नंदुरबार जिल्ह्य़ातील अयान मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड हे खाजगी साखर कारखाने आणि बारामतीतील Baramati डायनॅमिक्स डेअरीची दुसऱ्या दिवशीही इनकम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरु आहे.

दरम्यान, देशातील आणि राज्यातील राजकारणाची पातळी ज्या पद्धतीने खाली घसरली आहे ते धक्कादायक आहे. सरकारी यंत्रणांचा अयोग्य वापर करत एखाद्याचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपला काही नवीन नाही ते त्यांच्या रक्तातच आहे पण या व्यक्तीवरचा राग म्हणून त्याच्या कुटुंबाला , बहिणींना त्रास देण्याची ही कुठली पद्धत?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे. IT Raids on Pawar Family residence still on

- अजित पवार
BJP टीम नड्डा -२ मध्ये नव्या चेहऱ्यांना स्थान, राणेंचे नाव वगळले

एखादी व्यक्ती आपल्या यंत्रणेला जुमानत नाही , आपल्या पक्षाला जुमानत नाही तेंव्हा त्याच्या कुटुंबातील महिलांना टार्गेट करून त्या व्यक्तीला हार मानायला लावणार असाल तर लक्षात ठेवा की ते अजित दादा आहेत. माणूस स्वतःवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करेल परंतु यामध्ये विनाकारण घरातील महिलेला मध्ये ओढून यातून राजकारण करत असेल तर तो व्याजासकट याचा हिशोब चुकता करत असतो, असेही चाकणकर यांनी म्हटले आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com