लॉकअपमध्ये गेल्यापासून मी फक्त पाण्यावर आहे; जेलमधून बाहेर आलेल्या सदावर्तेंचं वक्तव्य

'येणाऱ्या काळात कष्टकऱ्यांसाठी लढणार आहेत. माझी मुस्कटदाबी केली तरीही मी मागे फिरलो नाही.'
Gunaratna Sadavarte
Gunaratna SadavarteSaam TV

सुशांत सावंत -

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात महाराष्ट्रत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हल्ल्याच्याच दिवशी ८ एप्रिल रोजी सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आतापर्यंत मुंबई, सातारा, कोल्हापूर या तीन पोलीस ठाण्यातुन सदावर्तेवर (Gunaratna Sadavarte) कारवाई त्यांना अटक करण्यात आली होती. कोल्हापूर पोलिसाची कोठडी काल संपल्यानंतर मुंबईमधील आर्थर रोड कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. पण सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता कोर्टाने त्यांना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे १९ दिवसानंतर सदावर्ते जेल मधून बाहेर आले त्यावेळी सदावर्तेंना घेण्यासाठी त्याची पत्नी जयश्री पाटील, व त्यांची मुलगी आली होती.

यावेळी बोलताना ते म्हणाले, सरकारला काय करायच ते करुदे पण तत्व सोडायची नाहीत, लॉकअपमध्ये गेल्यापासून मी फक्त पाण्यावर आहे. येणाऱ्या काळात कष्टकऱ्यांसाठी लढणार आहेत. माझी मुस्कटदाबी केली तरीही मी मागे फिरलो नाही असही ते म्हणाले. तसंच गुणरत्न सदावर्ते यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर घोषणा दिल्या, हम है हिंदुस्थानी, भारताच्या संविधानाचा हा विजय आहे.' भारताच्या संविधानापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही असं ते म्हणाले.

हे देखील पाहा -

दरम्यान, सोबत राहून माझ्या मित्र परिवाराने या अन्याया विरुद्ध मला सोबत दिली आणि महाराष्ट्रातल्या, देशातल्या हिंदुस्थानी कष्टकरी स्वागताला आला आहे. कष्टकरी वर्ग आमचा पुढचा केंद्र बिंदू असेल भ्रष्टाचार आणि या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे जे करता येईल ते सर्व आम्ही करू असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, सदावर्ते जेलमधून बाहेर येणार असल्यामुळे एसटी कर्मचारी मिठाई घेऊन जेल बाहेर दाखल झाले होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com