मोदी पूर्णपणे हिटलरला फॉलो करतात; संजय राऊतांची टीका

पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी अमित शहा यांनी एक कोटी लोक सायबरच्या माध्यमाने कामाला लावली.
मोदी पूर्णपणे हिटलरला फॉलो करतात; संजय राऊतांची टीका
Sanjay Raut/Narendra ModiSaam TV

मुंबई : शिवसेना अंगार हे बाकी सब भंगार है! ही घोषणा फक्त शिवसेनेलाच शोभते. जे अंगार आले ते कुठे डंपिंग ग्राऊंडला असतील, शिवसेना पक्ष तजेलदार, तरुण वर्गला नेतृत्व देणारा पक्ष आहे. बाळासाहेबांनी गरम रक्ताची तरुणाई पुढे आणली. सोशल मीडियावर सोसेल तेवढंच वर करा, असं म्हणत संजय राऊतांनी (Sanjay Raut) मिश्किल टोमणेबाजी केली ते आज राष्ट्रीय मिल मजदुर संघ हॉल, परळ येथे सोशल मीडिया (Social Media) सैनिक मेळाव्यात बोलत होते. यावेळी खासदार अरविंद सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, सामनामध्ये मी मराठीतुन लिहतो पण देशातील अनेक भाषेत त्याचे अनुवाद होतात. सोशल मीडियाचा सर्वात मोठा ब्रँड सामना आहे. देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा ब्रँड हा शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या काळात सोशल मीडिया नव्हता, बाळासाहेब हेच फेस होते. युद्धामध्ये सगळं क्षम्य असं. तुम्ही युद्धाचे नियम पाळणार नसाल तर मला तुमचा कोथळा काढावा लागेल. चांगल्या कामाची प्रसिद्धी होत नाही. चांगली बातमी दिली म्हणून पेपर संपत नाही असंही राऊत यावेळी म्हणाले.

तसंच, माझ्या नेत्याची भूमिका मला पोहचवयाची आहेत. हिटलर हा लोकप्रिय नेता होता, बाळासाहेबांचा आवडता होता. आताचे पंतप्रधान ही हिटलर सारखेच आहेत. जो कोणी विरोधात बोलेल त्यावर राजद्रोहाचा खटला होऊ शकतो. हिटलर म्हणायचा सामान्य माणूस विचारवंत नसतो. हिटलरला इव्हेंट फार करायचा जे आता मोदी (Narendra Modi) करतात. मोदी हे पूर्णपणे हिटलरला फॉलो करतात अशी टीकाही राऊतांनी नरेंद्र मोदींवर केली.

हे देखील पाहा -

पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी अमित शहा यांनी एक कोटी लोक सायबरच्या माध्यमाने कामाला लावली. कोणत्या पोस्ट करायच्या, ममता बनर्जीवर काय बोलायचे हे सायबर सेलच्या माध्यमाने केले. तसंच धार्मिक, सामाजिक भावना, यावर पोस्ट केल्या गेल्या. उत्तर प्रदेश निवडणुकीत हिजाब पासून मुस्लिमांच्या अनेक विषयांवर सोशल पोस्ट केल्या गेल्या. ट्रेनिंग देत लाखो लोकांपर्यंत पोस्ट पोहोचवल्या आपली फौज यापेक्षा कमी आहे वाढवावी लागेल. शिवसेना नेत्यांच्या काळात वडापाव खाऊन लोकांनी कामे केली आता राज्य आपल्या हाती आहे. हल्ले परतवायचे असतील तर संजय राऊत, अरविंद सावंत नाही तर अनेक जणांनी पुढे यायला हवे. मी रोज बोललो नाही तर पक्षाचा दिवसाचा अजेंडा सेट होणार नाही. मी बोललो नाही तर मीडिया, सोशल मीडियावर शिवसेना दिसणार नाही असही राऊत म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांचे पप्पू फेल हो गया, तर मनमोहन सिंग यांना मौनी बाबा असा नेरेटिव्ह सेट केले गेले. राहुल गांधी यांनी सरकार मध्ये जाऊन शिकायला हवे होते. जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान यांच्या विरोधात ट्विट केले ते किती देशद्रोही आहेत, हे सोशल मीडियावर फिरवले जात आहेत. माझ्यावर युट्युब वर बोलण्यासाठी काही नी काम दिले आहे. त्यांना संघाने पैसे दिले आहेत. एक एका युट्युबला दत्तक घेतले आहे. किरीट सोमय्या,निल सोमय्या हे बाप बेटे हे जाणार आहेत मी पुन्हा सांगतो. मी हे सोशल मीडियावर टाकले होते. असंही राऊतांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.