जातपंचायतीकडून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

सहकार नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
जातपंचायतीकडून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण
जातपंचायतीकडून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाणsaam tv

समाजातून बहिष्कृत केल्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली म्हणून जात पंचायतीने एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, या महिलेसह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने सहकार नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यावरून रुपेश कुंभार, निखिल कुंभार व तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा

फिर्यादी महिलेला त्यांच्या समाजाच्या जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत केले होते, त्या विरोधात त्यांनी तक्रार दिली होती, त्यावरून गुन्हाही दाखल करण्यात आला होता , या तक्रारीत महिलेने आरोपीचे नाव टाकले होते त्यामुळे आरोपीने त्या तक्रारीत आमचे नाव का टाकले असा जाब विचारून त्या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर या महिलेचा पती, आई व बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

जातपंचायतीकडून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समाजातील जातपंचायती रद्द करा - प्रा लक्ष्मण हाके

सदर महिलेला जातपंचायतीने मागील वर्षी समाजातून बहिष्कृत केले होते या विरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे, ही महिला पुण्यात माहेरी आलेली असताना सदर प्रकरणाचा राग मनात ठेवून या महिलेला मारहाण करण्यात आली, जातपंचायतीचे असे अनेक प्रकरणे समोर येत असताना पोलीस प्रशासनाने यावर कडक कारवाई करण्याची मागणी अंनिसने केली आहे.

Edited by : Ashwini jadhav kedari

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com