'शरद महोत्सव २०२१' उद्घाटनासाठी जयंत पाटलांची लोकलवारी!

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्ताने कल्याण डोंबिवली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड यांच्या वतीने 'शरद महोत्सव २०२१' चे आयोजन करण्यात आले आहे.
'शरद महोत्सव २०२१' उद्घाटनासाठी जयंत पाटलांची लोकलवारी!
'शरद महोत्सव २०२१' उद्घाटनासाठी जयंत पाटलांची लोकलवारी!SaamTvNews

-- रश्मी पुराणिक

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्ताने कल्याण डोंबिवली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड यांच्या वतीने 'शरद महोत्सव २०२१' चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे आज जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्घाटन केले.

हे देखील पहा :

कला, संस्कृती, परंपरा, क्रिडा गृह उद्योग या सर्वांची सांगड घालण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मला विश्वास आहे की कल्याण डोंबिवली येथील नागरिक या महोत्सवास भरभरून प्रतिसाद देतील. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील मनपा निवडणुकीत ६५०० कोटींच्या पॅकेजची घोषणा शहराला केली होती. पण शहराला त्यातले काहीच मिळाले नाही. कल्याण डोंबिवलीकर येत्या निवडणुकीत त्या ६५०० कोटींचा हिशोब मागतील याबाबत माझ्या मनात शंका नाही असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

'शरद महोत्सव २०२१' उद्घाटनासाठी जयंत पाटलांची लोकलवारी!
Beed : भंडारा दुर्घटनेची पुनरावृती टळली; नर्समुळे वाचले 12 नवजात बालकांचे प्राण!

पुढे बोलताना पाटील म्हणाले, अप्पा साहेब शिंदे यांच्या रुपाने एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व शहराला मिळाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील राहू. या शहराला ६५०० कोटींची नाही तर विश्वासाची गरज आहे आणि राष्ट्रवादी हा विश्वास देईल.

या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष अप्पा शिंदे, कार्याध्यक्ष वंडार शेठ पाटील, प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते, प्रदेश चिटणीस प्रकाश तरे, सोनिया धामी, नगरसेवक भरत गंगोत्री, ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर पाटील, ठाणे जिल्हा महिला निरीक्षक माया कटारिया, कल्याण डोंबिवली महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड आणि पक्षातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.