Silver Oak हल्ला प्रकरणी जयश्री पाटलांवर अटकेची टांगती तलवार

सिल्वर ओक हल्ल्या प्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील या देखील सहआरोपी आहेत.
Jayashree Patil
Jayashree PatilSaam TV

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओकवर या मुंबईतील बंगल्यावरती हल्ला केल्या प्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील या देखील सहआरोपी आहेत, याच जयश्री पाटील यांनी आताॉ मुंबई सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.

जयश्री पाटील (Jayashree Patil) यांच्यावरही सिल्वर ओक हल्ल्या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी त्यांनी अप्पर सत्र न्यायाधीश आर एम सादराणी यांच्या समोर याचिका दाखल केली असून या अटकपूर्व जामिनासाठी याचिकेवरती आज दुपारी तातडीची सुनावणीची मागणीही केली आहे.

Jayashree Patil
Satara: पोलीस कोठडीतून बाहेर पडताच गुणरत्न सदावर्ते म्हणाले...!

दरम्यान, आता त्यांना दिलासा मिळणार की त्यांनापण अटक होणार हे न्यायालयाचे निकालावरती अवलंबून आहे. मात्र, तोपर्यंत पाटील यांच्यावरती अटकेची टांगती तलवार असणार आहे. तर दुसरीकडे जयश्री पाटील यांचे पती गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना आज सातारा न्यायालयात हजर केलं असून त्यांना पाेलीस काेठडी मिळते की न्यायालयीन काेठडी मिळणार का त्यांना अन्य जिल्ह्यातील पाेलीस ताब्यात घेणार हे पण आज समजणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com