Silver Aok हल्ला प्रकरणी जयश्री पाटलांची अटक टळली

आज मुंबई सत्र न्यायाल्याचे अप्पर सत्र न्यायाधीश आर एम सादराणी यांच्या समोर जयश्री पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती
Jayashree Patil
Jayashree PatilSaam TV

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील या देखील सहआरोपी आहेत. जयश्री पाटील यांना आता मुंबई सत्र न्यायाल्याचा मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने पोलिसांना पाटील यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत.

आज मुंबई सत्र न्यायाल्याचे अप्पर सत्र न्यायाधीश आर.एम सादराणी यांच्या समोर जयश्री पाटील (Jayashree Patil) यांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर तातडीची सुनावणी घेण्यात आली असून या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पाटील यांना 29 तारखेपर्यंत अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com