...तर तो शिवद्रोह नाही का? मनसेच्या झेंड्यावरुन आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

Jitendra Awhad On Raj Thackeray: मनसेच्या भगव्या रंगाच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शिवमुद्रा (Shivmudra) वापरण्यात आली आहे.
...तर तो शिवद्रोह नाही का? मनसेच्या झेंड्यावरुन आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला
jitendra awhad has criticized the raj thackeray for using shivmudra on mns flag, Jitendra Awhad On Raj ThackeraySaam Tv

भूषण शिंदे

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण या पक्षाचा झेंडा बदलूनन नवा झेंडा (MNS New Flag) जाहिर केला होता. भगव्या रंगाच्या या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शिवमुद्रा (Shivmudra) वापरण्यात आली आहे. शिवकालीन असलेली ही राजमुद्रास मनसेच्या (MNS) राजकीय झेंड्यावर वापरल्याने राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. आव्हाड म्हणाले की, भारतात अशोक स्तंभ ही राजमुद्रा जसे कोणी वापरू शकत नाही. वापरली तर द्रोह आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची तत्कालीन राजमुद्रा आता वापरणे हा शिवद्रोह नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (jitendra awhad has criticized the raj thackeray for using shivmudra on mns flag)

हे देखील पाहा -

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, संभाजी राजे यांनी आधी समाधी बांधली होती. 1818 ला ब्रिटिशांनी हा किल्ला सर केला. इंग्रजांनी समाधी असल्याची पत्र असल्याचे दिले आहेत. पेशव्यांनी या समाधीकडे कधीच पाहिलेलं नाही. किल्ल्याची व्यवस्थित रचना करण्याचं काम त्यांना जमलं नाही.1869 महात्मा फुले रायगडवर गेले, त्यांनी ती समाधी समोर आणली. फुले यांनी त्यानंतर जीर्णोद्धाराची पाहिली सभा घेतली. रायगडावर लोकमान्य टिळक दोनदा गेले हे इतिहासात नोंद आहे. लोकमान्य टिळक यांनी डेक्कन बँकेत पैसे जमा केला आणि ती बँक बुडाली असं ते म्हणाले. (Jitendra Awhad On Raj Thackeray)

पुरंदरेंवर नाही तर त्यांच्या कादंबरील आक्षेप

माझा कोणावर आक्षेप नाही. मी कोणाशीही डिबेट करायला तयार आहे. समाधी बांधण्याचा संबंध टिळकांशी नाही, त्यांनी एकही वीट वर नेलेली नाही. इतिहासाची खेळू नका, त्यातून वाद निर्माण होतील. भारतात शिवाजी महाराज यांचा इतिहास ज्यांनी लिहिला आहे, त्यात पुरंदरेंनी कादंबरी लिहिली. पुरंदरे यांचा आम्हाला आक्षेप नाही, पण त्यांच्या कादंबरीला आहे असं आव्हाड म्हणाले.

jitendra awhad has criticized the raj thackeray for using shivmudra on mns flag, Jitendra Awhad On Raj Thackeray
मनसेकडून उद्या होणाऱ्या महाआरत्या रद्द; राज ठाकरेंनी ट्विट करून दिली माहिती

राज ठाकरेंवर टीका करताना जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, संस्कृत वाङ्मय नास्तिक हा शब्द आलेला आहे. वेदांचा वर्चस्ववाद दोघांनीही नाकारला. प्रत्येकाने वेद नाकारले आहेत. हे वेदाला विरोध करत हे सगळे घडलं आहे. जेम्स लेनचा विषय ते का काढतात? पुरंदरे यांना 2000 च्या इतिहासकर्त्यांनी त्यांना बाद ठरवलं. जिजाऊ आणि शाहजी राजे यांची तुलना होऊ शकत नाही असं जेम्स लेनचं म्हणणं आहे. इतिहासाच्या बाबतीत आम्ही कोम्प्रोमाईज करणार नाहीत. बाबासाहेबांनी पुस्तकात लिहिलेलं आहे. बहुजनांची पोरं नादी लावण्यासाठी भाषण करायचं नसतं. मला आश्चर्य वाटतं की कधी त्यांना शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घ्यावसं वाटत नाही. भारतात अशोक स्तंभ असलेली राजमुद्रा जसे कोणी वापरू शकत नाही, वापरली तर द्रोह आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची तत्कालीन राजमुद्रा आता वापरणे हा शिवद्रोह नाही का? असा टोला आव्हाडांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.