मला टार्गेट का केलं जातंय याबद्दल काहीच माहीत नाही : जितेंद्र आव्हाड

राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया रखडली आहे. या राजकीय घडामोडीवर मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मला टार्गेट का केलं जातंय याबद्दल काहीच माहीत नाही  : जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad Saam Tv

सुशांत सावंत

मुंबई : राज्यसभा निवडणुकीची मतदान (Voting) प्रक्रिया पूर्ण झाली आहे.राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) आज ३.३० वाजेपर्यंत विधानसभेच्या २८५ सदस्यांनी मतदान केले आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया रखडली आहे. या राजकीय घडामोडीवर मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jitendra Awhad
राजकारणातील डावपेच शिकून घेणं गरजेचं; दीपाली सय्यद यांचा आव्हाडांना सल्ला

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मतदानावर आक्षेप घेण्याच्या भाजपच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाड यांनी पहिला प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'मी बारा ते साडे बारा वाजण्याच्या दरम्यान विधान भवनात आलो. मी मतदान करायला गेलो. त्यानंतर मतदान करून बाहेर आलो. मी मतदानाची जी क्रिया केली त्यातून काही झाली आणि मत बाद व्हावे असं काही झालं असं मला वाटत नाही'.

Jitendra Awhad
Rajya Sabha Elections: महाविकास आघाडीने का घेतला आक्षेप? पत्रात काय म्हटलंय वाचा!

'कारण नसताना हे खेळ करायचे हे बरोबर नाही. माझ्याकडून चूक झाली नाही. मी जर तसे केले असेल तर मला माझी पार्टी सहा वर्षे निलंबित करू शकते. दुर्दैवाने राज्याला वेठीस धरले जात आहे. मी हात लावला हे कसे दिसले ?.मला का टार्गेट केलं जातंय याबद्दल काहीच माहीत नाही.मी खूप विचार केला कुणाशी काही बोललो नाही.आम्ही कुठे चुकलेलो नाही हे मला राज्याला सांगावेसे वाटत आहे. मी माझं स्पष्टीकरण ज्ञात व्हावे यासाठी आलो आहे. माझ्या हातून कोणतीही चुकी झाली नाही, असंही आव्हाड म्हणाले.

भाजपने का आक्षेप का घेतला ?

राज्यसभेच्या सहा जागेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. दोन वाजेपर्यंत 281 आमदारांचं मतदान झालं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपचे (BJP) पोलिंग एजंट मतदानाच्या ठिकाणी बसले आहेत. दरम्यान, भाजपचे पोलिंग एजंट पराग अळवणी यांनी जितेंद्र आव्हाड यांचे मत बाद करण्याची मागणी केली आहे.

आमदारांनी मतदान केल्यानंतर आपल्या गटाने नेमून दिलेल्या प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक आहे.यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपत्रिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हातात दिली. त्यामुळे भाजपने आक्षेप घेतला. भाजपने आतापर्यंत तीन मतांवर आक्षेप घेतला आहे. भाजपने आक्षेप घेतलेल्या मतांमध्ये सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या नावाचा सामावेश आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com