अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेवरुन जितेंद्र आव्हाड नाराज म्हणाले...

कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही - जितेंद्र आव्हाड
Amol Kolhe & Jitendra Awhad
Amol Kolhe & Jitendra AwhadSaam Tv

मुंबई - राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या चित्रपटात नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार आणि अभिनेता अमोल कोल्हे अडचणीत आले आहेत. कारण त्यांच्या पक्षाचे सहकारी आणि महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या चित्रपटाला आणि अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) साकारलेल्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.

मराठी मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हे यांनी ३० जानेवारी रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात गोडसेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

हे देखील पहा -

मात्र जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंनी ही भूमिका साकारल्याचा निषेध नोंदवला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेचीभूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही,अशा शब्दांमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

विनय आपटे , शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार, असे देखील आव्हाड म्हणाले.

काय म्हणले अमोल कोल्हे ?

यावर कोल्हे यांनी दावा केला की, या चित्रपटाचे चित्रीकरण २०१७ साली झाले होते. मी कोणत्याही राजकारणात नसताना ही भूमिका साकारली होती. माझ्या सध्याच्या राजकीय संलग्नतेचा 2017 मधील माझ्या अभिनय निवडीशी संबंध जोडणे अयोग्य आहे असे मला वाटते. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत. पण वास्तविक जीवनात मला गोडसेबद्दल प्रेम नाही किंवा महात्मा गांधींबद्दल द्वेषही नाही, असे अमोल कोल्हे म्हणले.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com