पुणे-नाशिकचा प्रवास सुखद; नारायणगाव बायपासचं काम पूर्ण

आता नारायणगावातून जाणारा पुणे बायपास हा पुणे ते नाशिक दरम्यानचा प्रवास सुखकर होणार आहे.
पुणे-नाशिकचा प्रवास सुखद; नारायणगाव बायपासचं काम पूर्ण
पुणे-नाशिकचा प्रवास सुखद; नारायणगाव बायपासचं काम पूर्णTwitter/@nitin_gadkari

पुणे - देशभरात अनेक ठिकाणी वाहतुकीला सुसज्ज असे महामार्ग बनवण्यात येत आहे. हे संपूर्ण काम केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात केले जात आहे. पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ताही तयार झाला असून या रस्त्याचे फोटो खुद्द नितीन गडकरी यांनी ट्विट करत शेअर केले आहे. आता नारायणगावातून Naryangaon जाणारा पुणे बायपास हा पुणे ते नाशिक Nashik दरम्यानचा प्रवास सुखकर होणार आहे. आता कृषी उत्पादने मुंबई-पुणे मार्केटमध्ये सहज पोहोचू शकतात, असेही नितीन गडकरी Nitin Gadkari ट्विट करत म्हणाले आहेत.

हे देखील पहा -

५ वर्षांपूर्वी पुणे-नाशिक महामार्ग नारायणगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली होती. तसेच नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्याचे काम २०१६ ला सुरू झाले होते. सुमारे ५ किलोमीटर लांब आणि ६० मीटर रुंदीच्या बाह्यवळण रस्त्याचे काम २०१८ मध्ये भूसंपादनाच्या कारणास्तव रखडले होते. त्यानंतर आता या बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.

पुणे-नाशिकचा प्रवास सुखद; नारायणगाव बायपासचं काम पूर्ण
नांदेडच्या सिईओ यांची शाळेला अचानक भेट; ५ शिक्षक निलंबित!

पुण्यातून थेट नाशिक आणि मुंबईला पोहोचणे आता शक्य होणार आहे. तसेच पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून आता नागरिकांना सुटका होणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com