'महाराष्ट्रात फक्त भाजप राहणार...; जे. पी. नड्डांच्या वक्तव्यावर दीपक केसरकर म्हणाले...

देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपाच राहणार असे विधान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केले.
Deepak Kesarkar
Deepak KesarkarSaam Tv

मुंबई: देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपाच राहणार असे विधान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केले आहे. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो, तर देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असे ते म्हणाले आहेत. महाराष्ट्रात फक्त भाजप राहणार आहे, बाकी सर्व पक्ष संपणार आहेत, असंही नड्डा म्हणाले होते. या वक्तव्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वक्तव्यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जे पी नड्डा बिहारमध्ये भाजपाच्या १४ जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी राज्यातील पक्षांविषयी वक्तव्य केले.

Deepak Kesarkar
आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकांना सामोरे जा; आदित्य ठाकरेंचे चॅलेंज

जे पी नड्डा एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांना शिवसेना आणि भाजप युती असे म्हणायचे असेल. राज्यात सध्या युती आहे. ते म्हणताना त्यांची चूक झाली असेल अस मला वाटत आहे. ज्या शिवसेनेने त्यांना फसवले आहे, त्यांच्याबद्दल ते म्हणत असतील तर त्यांच्यावर मी काही कमेंट करु इच्छीत नाही, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली.

हे देखील पाहा

“भाजपाच्या विरोधात लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष आज शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई कुटुंबवाद आणि घराणेशाहीविरोधात आहे”. विचारधारेवर चालणारा एकमेव पक्ष असल्याने फक्त भाजपाच राहणार असा दावाही यावेळी नड्डा यांंनी केला.

Deepak Kesarkar
'रातकिड्याला वाटते सकाळ होत नाही पण...'; जेपी नड्डांच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हेंचं प्रत्युत्तर

जेपी नड्डांच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हेंचं प्रत्युत्तर

'फक्त भाजप पक्ष राहणार असं म्हणणाऱ्यांना सांगवं अस वाटतं की, जेव्हा सायंकाळ होते तेव्हा रातकिड्याला वाटते सकाळ होत नाही पण, असं होत नाही.' असं म्हणत विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

त्या आज सारसबाग कॉर्नर, स्वारगेट येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार आणि अभिवादन करण्यासाठी आल्या असता माध्यामांशी बोलत होत्या.

भाजपशी (BJP) मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही. तसेच महाराष्ट्रात शिवसेनेचा (Shivsena) अंत होत असून, देशात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावा जे.पी नड्डा यांनी केला आहे. शिवाय कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही जो भाजपला पराभूत करू शकेल असंही नड्डा यांनी बिहार मध्ये केलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com