६ जून हा ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार; राज्य सरकारचा निर्णय

६ जून रोजी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन साजरा करावा, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
६ जून हा ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार; राज्य सरकारचा निर्णय
Shivswarajya Day Saam Tv

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या शिवस्वराज्यभिषेक दिनी स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन साजरा करावा, अशा सूचना शासनाने (Maharashtra Government) दिल्या आहेत. (Shivswarajya Day)

सोमवारी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करतील.

Shivswarajya Day
मनसे आमदार राजू पाटील 'नॉट रिचेबल'; राज्यसभेसाठी मनसेचे मत कोणाला?

या दिनाचे औचित्य साधून सोमवार, ६ जून २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, फोर्ट, मुंबई येथे हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ग्रंथ निवड समितीचे अध्यक्ष प्रताप आसबे, साहित्यिक अरुण म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. (Shivswarajya Day)

या नियोजित कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्र.ग्रंथालय संचालक शालिनी इंगळे यांनी केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com