जुन्नरमध्ये भरदिवसा पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा...

दरोडेखोरांनी व्यवस्थापकाला गोळी घालुन केले ठार; महिन्यातील दुसरी घटना...
जुन्नरमध्ये भरदिवसा पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा...
जुन्नरमध्ये भरदिवसा पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा...रोहिदास

पुणे - शिरुर (Shirur) तालुक्यातील पिंपरखेड येथील महाराष्ट्र (Maharashtra) बँकेच्या दरोड्याची घटना ताजी असताना जुन्नर (Junnar) तालुक्यात १४ नंबर फाट्यावर दोन दरोडेखोरांनी शस्त्र हातात घेऊन अनंत ग्रामीण पतसंस्थेवर आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकला. या दरोड्यात दोन लाख पंन्नास हजार रुपयांची रक्कम दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी बँकेत बँक व्यवस्थापक दशरथ भोर आणि महिला कर्मचारी हजर होते.

हे देखील पहा -

याच दरम्यान दोन दरोडेखोर हातात पिस्तुल घेऊन धमकात होते.याच दरम्यान व्यवस्थापक दशरथ भोर यांनी विरोध केला असता त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली. यामध्ये बँकेचे व्यवस्थापक दशरथ भोर यांचा मृत्यु झाला आहे. नारायणगाव आणि आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन दरोडेखोरांचा शोध सुरु आहे. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा टाकल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com