Kalyan Crime News: काळा तलाव परिसरात तुफान राडा; अल्पवयीन मुलांनी केले चाकूने वार, थरारक घटनेचा व्हिडिओ VIRAL

Crime News Kala Talaw: या वादाचे रुपांतर पुढे हाणामरीत झाले आहे. घटनेत ३ मुलं भंगीर जखमी झाली आहेत.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam TV

अभिजित देशमुख, कल्याण

Kalyan News: कल्याण काळा तलाव परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काळा तलाव येथील उद्यानात झोपाळ्यावर बसण्यावरून राडा झालाय. यावेळी दोन गटात मोठा वाद झाला. या वादाचे रुपांतर पुढे हाणामरीत झाले आहे. या घटनेत ३ मुलं भंगीर जखमी झाली आहेत. (Latest Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, उद्यानात झोपाळ्यावर बसण्यावरून या मुलांमध्ये वाद झाला. यावेळी अल्पवयीन मुलांनी एका २७ वर्षीय तरुणासह दोन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केली आहे. यावेळी त्यांनी चाकूने मुलांवर सपासप वार केलेत.

Kalyan Crime News
Pune Crime News: मोबाईल, दागिने सोडून नको त्या गोष्टीची झाली चोरी; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या संपूर्ण शहरात व्हायरल होतोय. महात्मा फुले पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर घटनेनं कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com