Kalyan: पैशांसाठी मुलगा बनला हैवान; जन्मदात्या आईसोबत केलं भयावह कृत्य

कल्याणमधील हनुमान नगर भागात राहणाऱ्या बेरोजगार मुलाने पैशासाठी जन्मदात्या आईची हत्या केली आहे.
Crime Kalyan
Crime KalyanSaam TV

कल्याण: एका बेरोजगार मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईची हत्या करुन नराधम मुलाने आईने स्वत:ला गळपास लावून आत्महत्या केल्याचा बनाव देखील केल्याचं उघडं झालं असून आरोपी मुलाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण (Kalyan) पूर्वेतील कोळसेवाडी भागातील हनुमान नगर भागात राहणाऱ्या बेरोजगार मुलाने पैशाच्या कारणावरुन जन्मदात्या आईचा गळा नायलॉनच्या दोरीने आवळून तिची हत्या केली. आईचा खुन केल्याचं लपविण्यासाठी नराधम मुलाने आईचा मृतदेह घराच्या छताला लटकून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.

Crime Kalyan
Viral Video : RPF जवान नसता, तर हा माणूस आज जिवंत नसता, थरारक घटना CCTVत कैद

मात्र, पोलिसांनी (Police) या आरोपी मुलाचा बनाव उघड करुन त्याला अटक केली आहे. सरोजा पुमणी असं मयत महिलेचे नाव आहे. तर रवी पुमणी (३४) राहणार प्रभुकुंज सोसायटी, मनीषा गॅस एजन्सी गोदाम जवळ, हनुमान नगर, कल्याण पूर्व असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

रवी पुमणी हा बेरोजगार आहे. त्याला नोकरी, व्यवसाय नसल्याने तो नियमित आई सरोजा हिच्याकडे बाहेर उधळपट्टी करण्यासाठी पैशाची मागणी करायचा. सतत पैसे देणे शक्य नसल्याने आई सरोजा त्याला नकार दिला की रवीला तिचा राग यायचा.

Crime Kalyan
मोठी बातमी : तहाराबाद ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल नंदन यांना अटक

मंगळवारी रात्री दीड वाजता आई सरोजा, मुलगा रवी दोघे जण घरात असताना पुन्हा या दोघांमध्ये पैशांच्या विषयावरुन वाद झाला. या वादादरम्यान आईने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यामुळे संतप्त झालेल्या रवीने आईशी भांडत तिला बेदम मारहाण केली.

रागाच्या भरात त्याने आईला जमिनीवर पाडून तिच्या गळ्याला नायलॉनच्या दोरीचा फास लावला त्याच आई सरोजा यांचा जागीच मृत्यू झाला. आईचा खून केल्यानंतर हे प्रकरण आता आपल्या अंगलट येईल या भीतीने रवीने आईने सरोजाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा बनाव रचला.

आईचा मृतदेह दोरीच्या साहाय्याने घरातील पंख्याला लटकवत. शेजाऱ्यांना आपण घरात आपल्या खोलीत झोपलो असताना आपल्या नकळत आईने गळफास घेतला असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. दरम्यान याबाबतची कोळसेवाडी पोलिसांना या गुन्ह्याची माहिती मिळाली असता, पोलिसांनी मुलगा रवी याची पार्श्वभूमी तपासली आणि त्याची सखोल चौकशी केली.

चौकशीदरम्यान, आपणच आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली रवीने दिली. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिगंबर पवार यांच्या तक्रारीवरुन रवी पुमणी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रकरणाचा पोलिस करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com