
अभिजीत देशमुख
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीची काहीजण छेड काढत असल्याने ती मानसिक तणावात होती. यातूनच तिने जीवन संपल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण पश्चिम परिसरातील ही घटना आहे. कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
कल्याण पश्चिमेतील एका परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासोबत राहत होती. शुक्रवारी ती मानसिक तणावात असल्याचं घराच्यांना निदर्शनात आलं. तेव्हा तिच्या भावाने तिच्याकडे याबाबत चौकशीही केली. भावाला सांगितले की, माझ्यासोबत काहीतरी वेगळेच घडले आहे. माझ्यासोबत माझ्या मित्रांनी गैरकृत्य करत छेडछाड केली आहे. हे ऐकताच भावाला काही सुचेनासे झाले तो घराबाहेर गेला आणि काही वेळाने घरात आता त्यावेळी बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
घडला प्रकार पाहून त्याला जबर मानसिक धक्का बसला. याची माहिती बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पवार आणि महिला पोलिस अधिकारी दीपाली वाघ यांनी पुढील प्रक्रिया सुरु केली. मुलीचा मृतदेह रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला असून मुलीच्या मैत्रिणी, तिचे मित्र त्यांची चौकशी सुरु केली. (Crime News)
या चौकशीतून जे समोर आले आहे ते अतिशय धक्कादायक आहे. या मुलीला चार दिवसापूर्वी तिच्या दोन मित्रांनी आपण मॉलला जाऊ असं सांगितलं. मॉलच्या बाजूला या पैकी एका मित्राचे घर आहे. त्याठिकाणी सर्व जण जमले. मुलीचे मित्र आणि त्या मित्रांचे दोन मित्र असे चार जण होते. या चौघांनी मुलीसोबत छेडछाड केली आणि तिला धमकावले. (Latest News Update)
या तणावातूनच मुलीने आत्महत्या केली. मुलीसोबत छेडछाड करणाऱ्यांविरोधात भादवि ३०६ , ३५४, ३४ पोक्सा ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मुलीचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात पाठवला आहे. मुलीसोबत छेडछाड झाली आहे की, तिच्यासोबत आणखी काही गैर प्रकार घडला आहे. हे तिच्या शवविच्छेदन अहवालात कळणार आहे. अहवालात काही आढळून आल्यास पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, असं पोलिसांना सांगितलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.