Kalyan News : पोलीस बनून आला अन् दुचाकी घेऊन फरार झाला...;अवघ्या अडीच तासात पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

Crime News : याआधी देखील अशाप्रकारे गुन्हे केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
Kalyan News
Kalyan News Saam TV

अभिजीत देशमुख

Crime News : पोलीस जनतेचे रक्षण करतात. एखादी चुकीची घटना घडत असल्यास पोलिस नागरिकांना ठणकावून वठणीवर आणताता. मात्र काही व्यक्ती चोरीसाठी चक्क पोलिसांचे वेश देखील घेतात आणि भोळी जनता त्यांच्या जाळ्यात अडकून फसली जाते. पोलिसांचे सोंग घेऊन आजवर चोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.(Latest Crime News)

कल्याणमधील कोळसेवाडी परिसरात देखील अशीच एक घटना घडली आहे. पोलीस असल्याचं सांगत एका चोरट्याने तरुणाची दुचाकी लंपास केली आहे. मात्र या तोतया पोलिसाला कोळशेवाडी पोलिसांनी अवघ्या अडीच तासात अटक केली आहे. दिलीप पाटील असं चोरट्याचं नाव असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. त्याने याआधी देखील अशाप्रकारे गुन्हे केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

Kalyan News
Crime News : रेल्वे स्थानकावर ड्रममध्ये तरुणीचा मृतदेह; CCTV फुटेजमध्ये दिसून आलं धक्कादायक दृश्य...

नेमकं काय घडलं?

एका दुचाकीस्वाराला थांबवून आपण पोलीस असल्याचं सांगत दोन जणांनी त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. दुचाकीस्वाराने पैसे नसल्याचे सांगीतल्याने तोतया दोन्ही पोलिसांनी तरुणाकडे दुचाकी मागितली. तरुणाची दुचाकी ताब्यात घेत आता ही दुचाकी तुम्ही पोलीस ठाण्यातून सोडवा असे सांगत त्यांनी तेथून पळ काढला.

दुचाकीस्वराने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात येऊन शहानिशा केली असता हा तोतया पोलीस असल्याचे समोर आले. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तत्काळ या चोरट्याचा शोध सुरू केला. एपीआय हरिदास बोचरे, एपीआय दिनकर पगारे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटिव्ही तपासले असता या चोरट्यांची ओळख पटवली. त्यानंतर अवघ्या अडीच तासात या दोघांनाही कल्याण चिंचपाडा परिसरातून अटक करण्यात कोळशेवाडी पोलिसांना यश आलेय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com