Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam Tv

Dombivli Crime News: प्रसादाच्या पेढ्यात दिलं गुंगीचे औषध, रिक्षा चालकाला लुबाडणारे दोन भामटे गजाआड

प्रसादाच्या पेढ्यात दिलं गुंगीचे औषध, रिक्षा चालकाला लुबाडणारे दोन भामटे गजाआड

>> अभिजित देशमुख

Kalyan Dombivli Crime News: प्रवाशी बनून रिक्षात बसल्यानंतर प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाला लुबाडणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई विष्णू नगर पोलिसांनी केली आहे.

सागर पारेख, संपतराज जैन अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने व मोबाईल असा सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Kalyan Crime News
Section 144 in Mumbai: मुंबईत आजपासून ११ जूनपर्यत जमावबंदी लागू; काय आहेत कारणं? वाचा सविस्तर...

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम गरीबाचा वाडा परिसरात राहणारे राकेश म्हामुणकर हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. राकेश डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा स्टँडवर रिक्षा घेवून रांगेत असताना दोन जण आले. त्यांनी बिर्ला मंदिर येथे जायचे असल्याचे सांगितले. राकेश यांनी दोघांना रिक्षात बसवले. (Latest Marathi News)

बिर्ला मंदिर येथे दर्शन घेवून हे दोघे पुन्हा रिक्षात बसले व त्यांनी राकेश यांना गुंगीचे औषध टाकलेला पेढा प्रसाद असल्याचे सांगत खाण्यास दिला. पेढा खाल्ल्यानंतर राकेश बेशुद्ध झाला. या दोन्ही प्रवाशी राकेशची सोन्याची चैन व मोबाईल घेवून पसार झाले. या प्रकरणी राकेश याने डोंबिवली विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत या दोन भामट्याचा शोध सुरू केला.

Kalyan Crime News
Anil Parab On kirit somaiya: प्रकरण अंगाशी आलं म्हणून मागे घेतलं; अनिल परबांचा किरीट सोमय्यांवर घणाघात

सीसीटिव्ही फुटेज व खबऱ्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींची ओळख पटवून या दोघांना विष्णू नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. सागर पारेख, संपतराज जैन अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व मोबाईल असा मिळून सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या दोघांनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसाना असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com