Kalyan News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचं ट्विटर अकाऊंट हॅक; हॅकरने लावला स्वतःचा फोटो

KDMC Twitter Account Hack: ही बाब काही सजग नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत विचारणा केली आहे.
KDMC Twitter Account Hack:
KDMC Twitter Account Hack:Twitter/@KDMCOfficial

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचं (KDMC) अधिकृत ट्विटर खाते हॅक (Hack) झाले असल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे @KDMCOfficial हे अधिकृत खाते काही अज्ञात हॅकर्सने हॅक केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही, मात्र ही बाब काही सजग नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत विचारणा केली आहे. (KDMC Twitter Account Hack)

KDMC Twitter Account Hack:
Instagram Bug: इन्स्टाग्रामवर '#Embeded' या हॅशटॅगला चुकूनही क्लिक करु नका, अन्यथा होईल मोठं नुकसान

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकृत आणि व्हेरिफाईड अकाऊंट आहे. या अकाऊंटला 35.7K Followers फॉलो करतात. आज, गुरुवारी सकाळी या अकाऊंटवरुन अचानक काही संशयास्पद पोस्ट करण्यात आल्या. एवढंच नाही, तर हॅकर्सने पालिकेच्या या अधिकृत अकाऊंटवरुन अनेक पोस्ट करण्यात आल्या. त्याचप्रमाणे या हॅकरसे पालिकेच्या ट्विटर खात्यावर स्वतःचा फोटोही लावला आहे. यानंतर चांगलाच गोंधळ उडाला आहे. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत तरी काहीही माहिती दिलेली नाही, तसेच काही वेळातच पालिकेच्या या अकाऊंटवरुन हॅकरने केलेल्या सर्व पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com