
फय्याज शेख
मुंबई: मध्य रेल्वेची कसारा ते कल्याण वाहतूक सेवा (Railway Service) ठप्प झाली आहे. उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ एका मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही मालगाडी रेल्वे रुळावरच उभी आहे. त्यामुळे कसाऱ्याहून कल्याणकडे जाणारी वाहतूक बंद आहे. अशात कसाऱ्याहून (Kasara) कल्याणकडे (Kalyan) निघालेली लोकल ट्रेन उंबरमाळी स्टेशनला उभी आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी एक तास लागण्याची शक्यता आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे सेवा ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले असून स्टेशनवर मोठी गर्दी जमत आहे. (Mumbai Local Train News)
पाहा व्हिडिओ -
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.