Kalyan Crime News: कल्याण खडकपाडा पोलिसांची मोठी कारवाई; देशभरात १०० गुन्हे दाखल असलेल्या इराणीच्या मुसक्या आवळल्या

Kalyan Crime News: मोक्कामधील फरार आरोपीला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी कर्नाटक राज्यातील धारवाड येथून अटक केली आहे
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam tv

अभिजीत देशमुख

Kalyan Crime News: पोलिसांचा खबरी असल्याचे बोलत एका इराण्यावर प्राणघातक हल्ला,देशभरात शंभरपेक्षा जास्त गुन्हे, मोक्कामधील फरार आरोपीला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी कर्नाटक राज्यातील धारवाड येथून अटक केली आहे. कल्याणच्या खडपाडा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

कासीम मुख्तार इराणी उर्फ तल्लफ नावाच्या या आरोपीला पकडण्यासाठी खडकपाडा पोलिसांचे पथक गेले असता तो राहत्या घराचे कौले फोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, खडकपाडा पोलिसांना पाठलाग करत त्याला बेड्या ठोकल्या. यावेळी झालेल्या झटापटीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. एक पिस्तूल, पाच महागड्या मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

Kalyan Crime News
Mumbai Crime News: मुंबईत चाललंय काय? घरात घुसून ४ वर्षीय मुलीवर अत्याचार

कल्याण डोंबिवलीचे नव्हे तर ठाणे जिल्ह्यात २० पेक्षा जास्त चैन स्नेचिंगच्या गुन्ह्यात फरार असलेल्या कासीम इराणी याच्याविरोधात देशभरात १०० हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. कासीम हा वृद्ध महिला,रस्तावरून चालणाऱ्या महिलाच्या गळ्यातून दागिने हिसकावून पळण्यात एक्सपर्ट आहे. या चोऱ्या करण्यासाठी तो महागड्या बाईक चोरायचा. चैन स्नेचिंग केल्यानंतर चोरी केलेल्या बाईक एखाद्या इमारतीच्या पार्किंग मध्ये ठेवून पसार व्हायचा.

२०२२ मध्ये आंबिवली येथील इराणी वस्तीत राहणारा जाफर इराणी नावाच्या तरुणावर कासीम याने प्राणघातक हल्ला केला. जाफर हा पोलिसांचा खबरी असून इराणी चोरट्याची माहिती तो पोलिसांना देतो. या संशयातून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हल्ला करुन कासीम हा फरार झाला होता. कासीम हा कर्नाटक येथील धारवाडमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Kalyan Crime News
Badlapur Crime News: बदलापूर हादरले! डॉक्टरकडून २५ वर्षीय गतीमंद तरुणीवर अत्याचार

पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पाेलिस निरिक्षक सर्जेराव पाटील, पोलिस निरिक्षक शरद झीणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अनिल गायकवाड यांच्या पथकाने धारवाड गाठले. कासीमला पकडण्यासाठी धारवाड आणि कल्याणच्या पोलिस तपास पथकाला तारेवरची कसरत करावी लागली.

कासीमला पकडण्यासाठी धारवाडचा एक आणि कल्याणचे दोन पोलिस जखमी झाले. अखेर त्याला अटक करण्यात आले आहे. त्याला जेरबंद करुन कल्याणला आणले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि पाच महागड्या बाईक हस्तगत करण्यात आले आहेत. पुढील तपास खडकपाडा पोलिस करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com