Kalyan : मलंगगड परिसरात जीन्स कारखान्यांचे पेव..!

उल्हासनगरमधील प्रदूषणास कारणीभूत ठरलेले जीन्स कारखाने बंद महापालिकेने बंद केले आहेत. या कारखानदारांनी आता नजीकच्या कल्याण आणि अंबरनाथ येथील ग्रामीण भागात स्थलांतर केले आहे.
Kalyan : मलंगगड परिसरात जीन्स कारखान्यांचे पेव..!
Kalyan : मलंगगड परिसरात जीन्स कारखान्यांचे पेव..!प्रदीप भणगे

कल्याण : उल्हासनगरमधील प्रदूषणास कारणीभूत ठरलेले जीन्स कारखाने बंद महापालिकेने बंद केले आहेत. या कारखानदारांनी आता नजीकच्या कल्याण आणि अंबरनाथ येथील ग्रामीण भागात स्थलांतर केले आहे. प्रदूषण महामंडळ, ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. ग्रामीण भागात ७० हून अधिक जीन्स कारखाने सुरू आहेत. रासायनिक पाण्यामुळे येथील शेतजमीन धोक्‍यात आली असून, या कारखान्यांना प्रतिबंध घालण्याची मागणी केली जात आहे.

हे देखील पहा :

https://www.youtube.com/watch?v=DsKbm2iRO1Mमलंगगड येथील नाऱ्हेण, उसाटने या ग्रामपंचायत हद्दीत हे कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांतून निघणारे केमिकल मिश्रित रंगीबेरंगी पाणी, त्याला येणारा उग्र वास यामुळे ग्रामीण भागात जल व वायू प्रदूषणाची समस्या वाढली आहे. तर, रासायनिक पाण्यामुळे सुपीक जमिनीचा पोत नाहीसा होत आहे. हे सर्व कारखाने माळरान शेतजमिनीत सुरू करण्यात आल्यामुळे तालुक्‍यातील भाताची व भाजीपाल्याची शेती धोक्‍यात आली आहे. तर, गावागावातील बोअरवेलचे पाणी देखील आता प्रदूषणीत झाले आहे.

याच जीन्स कारखान्यातून कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट उघड्यावर पाणी सोडले जात आहे. त्यामुळे कुंभार्ली गावातील अनेकांच्या बोअरवेलचे पाणी खराब झाले आहे. हे कारखाने सध्या नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. मात्र, अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का असा सवाल नागरिक विचारू लागले आहे.          

Kalyan : मलंगगड परिसरात जीन्स कारखान्यांचे पेव..!
Latur : शिवारातला आक्रोश थांबवा, अन्यथा झाडाला लटकलेली प्रेतं दिसतील : शेट्टी

ग्रामपंचायतींची बघ्याची भूमिका त्रासदायक ! 

उसाटने आणि नाऱ्हेण ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या जीन्स कारखान्यांनी ग्रामस्थांचा जगणं कठीण केलं आहे. मात्र, याची माहिती ग्रामपंचायतींना असतानाही ग्रामसेवक मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. तर, प्रदूषण नियंत्रण महामंडळ देखील बघ्याची भूमिका घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळाला आणि ग्रामपंचायतींना माहिती असून देखील कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.