
कल्याणमध्ये अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. येथे एका गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास डॉक्टरांनी नकार दिला. त्यानंतर महिलेने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बाळाला जन्म दिला. ही घटना कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात घडली आहे.
कल्याण मधील स्काय वॉकवर एका गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलीस तत्काळ घटना स्थळी दाखल झाले. पोलीस आणि नागरिक काही हमालांच्या मदतीने तिला तातडीने एका हात गाडीवर ठेवून रुक्मिणी बाई रुग्णालयाच्या दिशेने घेऊन आले. रुग्णालयाने तिला प्रसूतीसाठी दाखल करून घेण्यास नकार देत आमच्याकडे स्टाफ नाही असे उत्तर दिले.
पोलीस आणि नागरिकांनी तिला दाखल करून घ्या आणि तिची प्रसूती करून घ्या, अशी विनंती केली. मात्र तरी देखील रुग्णालयातील स्टाफने त्यांना नकार दिला. तब्बल अर्धा तास हे महिला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर विव्हळत होती. अखेरीस त्या महिलेची प्रसुती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच झाली. सुदैवाने बाळ व महिला दोघे सुखरूप आहेत. मात्र या घटनेच्या निमित्ताने स्मार्ट सिटीच्या बाता करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेची आरोग्य यंत्रणा मात्र व्हेंटीलेटरवरच असल्याचे दिसून आलं. (Latest Marathi News)
त्याठिकाणी रुग्णालयातील उपस्थितीत स्टाफने त्यांच्याकडे प्रसूतीसाठी स्टाफ नसल्याचे सांगून महिलेली प्रसूती करण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिस विकास ठाकरे यांनी रुग्णालयाकडे विनंती केली. अहो महिलेच्या पोटातील बाळ हे अर्धे बाहेर आले आहे. तिची प्रसूती झाली नाही, तर तिच्यासह तिच्या बाळाचा मृत्यू होईल. या विनंती नंतरही रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला.
या महिलेला प्रसूतीसाठी महापालिकेच्या वसंत व्हॅली येथील प्रसूती गृहात घेऊन जा असे सांगितले. अखेरीस त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झाली. पोलिसांनी आणि हमालांनी रुग्णालय प्रशासनाच्या या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयातील स्टाफने साधी माणूसकी दाखविली नाही. महिलेची प्रसूती झाली असून तिला मुलगी झाली आहे.
प्रसूतीनंतर रुग्णालयाने तिला तिच्या नवजात मुलीसह एका लहान रुग्णवाहिकेतून वसंत व्हॅली प्रसूतीगृहात पाठविण्यात आले. दरम्यान, घडल्या प्रकाराविषयी रुग्णालयात ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही कुणाला बांधिल नाही. वरिष्ठांनी सांगितल्याशिवाय आम्ही कोणाला उत्तरे देणार नाही. प्रतिक्रिया देण्यास नकार देत काढता पाय घेतला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.