
Kalyan News : डोंबिवली जवळील ग्रामीण भागात खोणी ग्रामपंचायत हद्दीतील वडवली परिसरात अंतर्गत राजकारणामुळे ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप पाणी समस्येकडे तोडगा निघत नसल्याने संतापलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी खोणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे लेखी पत्र लिहून विषप्राशन करण्याची परवानगी मागितली आहे.
डोंबिवली जवळील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खोणी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. मात्र ग्रामपंचायतमधील अंतर्गत राजकीय वादांमुळे सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी सध्या भटकंती करावी लागत आहे. खोणी ग्रामपंचायत हद्दीतील वडवली परिसरात पाणी समस्या निर्माण झाली आहे. पाणी समस्या सोडवण्यासाठी गावात जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र या जलवाहिन्या कोरड्याच आहेत. (Kalyan News)
या परिसरातील महिला वर्गाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. धक्कादायक म्हणजे नियमित पाणी बिल भरून देखील निवडक सदस्यांच्या प्रभागात नियमित पाणी आणि इतरांना वेगळा न्याय हा ग्रामपंचायतीकडून दिला जात असल्याचा आरोप वडवली परिसरातील नागरिकांनी केला आहे.(Latest Marathi News)
पाण्यासाठी महिला आक्रमक झाल्या आहेत. पाणी समस्येबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार आणि बैठकांमध्ये तक्रारी करून देखील अद्याप पाणी समस्या न सुटल्याने आता प्रभातील ग्रामपंचायत सदस्यांनी विषप्राशन करण्याची परवानगी मागितली आहे. खोणी ग्रामपंचायतीच्या सदस्य जयश्री ठोंबरे आणि मुकुंद ठोंबरे यांनी पत्र लिहून आत्महत्या करण्यास परवानगी मागितली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.