मतदान याद्यांचा घोळ कायम! आढवली भागातील साडे सात हजार मतदान पिसवली प्रभागात...

यात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय - नगरसेवक मोरेश्वर भोईर...
Mumbai News
Mumbai NewsSaam Tv

कल्याण - कल्याण-डोंबिवलीत (Dombivli) मतदान याद्यांमध्ये घोळ झालेला वारंवार दिसून येत आहे.डोंबिवली पश्चिमे पाठोपाठ आता कल्याण मध्येही पालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कल्याण (Kalyan) डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या असून त्या अंतिम प्रभाग रचनेनुसार जे नकाशे प्रकाशित करण्यात आले किंवा ज्या चतुर सीमा प्रकाशित करण्यात आल्या त्यानुसार प्रभाग  क्र ४२ आणि ४३ हे संपूर्ण प्रकारे वेगळे असून देखील आढवली या भागातील साडेसात हजार मतदान हे पिसवली प्रभागात टाकण्यात आली आहेत. यावर आक्षेप घेत  यासंबंधितील तक्रार भाजपचे (BJP) माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी केली आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान याबाबत वारंवार संबंधित वॉर्ड अधिकारी आणि उपायुक्त यांच्या निदर्शनास आणून देखील अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यांनंतर हे मतदान पिसवली याच प्रभागात दिसून येत आहेत.यामुळे संबंधित अधिकार्यांना तक्रारी देऊन देखील दखल न घेतल्याने यात काहीतरी आर्थिक व्यवहार झाला असल्याचा संशय येतोय तसेच यात वॉर्ड अधिकारी आणि उपायुक्त यांच्यावर संशय असल्याचा नगरसेवक भोईर यांच्याकडून सांगण्यात आले.

Mumbai News
मोठी बातमी! राहुल शेवाळेंच्या गटनेतेपदी नियुक्तीला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता

यासंबधी तात्काळ केडीएमसी आयुक्त यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.तसेच यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन याविषयी तक्रार करून दाद मागणार आहे.तसेच संबंधित दोषी अधिकाऱ्यानंवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे भोईर यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com