Kalyan News: अरे बापरे! रुग्णालयात जाताना प्रसव कळा; कल्याणच्या स्कायवॉकवरच महिलेची प्रसूती, रिक्षा चालकांनी केली मदत

Kalyan News: कल्याण पूर्वे भागातील रेल्वे स्टेशनवरील स्कायवॉकवरुन गरोदर महिला रुग्णालयात जात असताना तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या.
Kalyan News
Kalyan NewsSaam tv

अभिजीत देशमुख

kalyan News:

अरेरावी भाषेसाठी रिक्षा चालक बदनाम असतात. मात्र आजही अनेक रिक्षा चालकांमध्ये माणुसकी शिल्लक असल्याचे दर्शन कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेवरून दिसून आले. कल्याण पूर्वे भागातील रेल्वे स्टेशनवरील स्कायवॉकवरुन गरोदर महिला रुग्णालयात जात असताना तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. त्यानंतर या महिलेची स्कायवॉकवरच प्रसूती झाली. तिच्या प्रसूतीसाठी रिक्षा चालक धावले. ही महिला आणि बाळ सुखरूप असल्याची माहिती रिक्षा चालकांनी दिली आहे. (Latest Marathi News)

कल्याण पूर्व भागात राहणारी गरोदर महिला सुरेखा शिंदे यांना प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात निघाल्या होत्या. कल्याण पूर्वेतील रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर पोहचल्यानंतर त्यांना प्रसूतीच्या वेदना असहाय्य होऊ लागल्या. वेदनांची तीव्रता वाढली. त्यामुळे त्यांच्या मदतीला रिक्षा चालक धावले.

रिक्षा चालकांनी त्यांना मदत मिळावी, यासाठी रुग्णवाहिकेसाठी १०८ नंबरला कॉल केला. मात्र, त्यांनीआम्हाला रुग्णवाहिकेसाठी आणखी २-३ कॉल आल्याचे सांगितले. परंतु आमची रुग्णवाहिका मदतीसाठी निघाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र त्याठिकाणी रुग्णवाहिकाच पोहचली नाही.

अखेर महिलेची अवस्था पाहून रिक्षा चालकांनी प्रसंगावधान राखलं. त्यांनी एका महिलेला पाचारण केले. याचदरम्यान त्या महिलेची प्रसूती स्कायवॉकवरच झाली.

Kalyan News
Guhagar Accident: टेम्पोचा ब्रेक फेल झाला अन् विसर्जन मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू, गुहागरमधील घटना

१०८ नंबरवर कॉल करुनही रुग्णवाहिका पोहचली नाही, त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेस पाचारण करण्यात आले. खासगी रुग्णवाहिकेतून प्रसूती झालेल्या महिलेसह तिच्या नवजात बाळास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले

ते धावले तिच्या मदतीला

रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन गणेशोत्सव मंडपात उपाध्यक्ष विजय तावडे, कार्यकर्ते संजय जगताप उपस्थित होते. त्यांनी प्रसंगावधान दाखविले. रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यास स्टँडवरील रिक्षा चालकांनीही मदत केली .

108 ने दगा दिला

काही दिवसापूर्वी गरदोर महिलेला प्रसूतीच्या वेदना स्कायवॉकवर सुरु झाल्यावर तिला हातगाडीवरुन महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले होते. त्या ठिकाणी तिला प्रसूतीकरिता दाखल करुन घेतले नव्हते. त्यामुळे त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या दारात झाली होती. त्यामुळे महापालिका रुग्णालयाची अनास्था उघड झाली होती.

आता पुन्हा एका महिलेची प्रसूती स्कायवॉकवर झाली. तिच्यासाठी १०८ नंबरवर रुग्णवाहिकेसाठी कॉल करुन रुग्णवाहिका आली नाही. या घटनेतून ही बाब उघड झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com