कल्याण: रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी एकाला अटक, 24 तासात आरोपी गजाआड!

दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास एका रिक्षाचालकाचा हत्येमुळे कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
कल्याण: रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी एकाला अटक, 24 तासात आरोपी गजाआड!
कल्याण: रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी एकाला अटक, 24 तासात आरोपी गजाआड!प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

कल्याण : दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास एका रिक्षाचालकाचा हत्येमुळे कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी  रिक्षाचालक अभिमान भंडारी याची हत्या करणाऱ्या सोपान पंजे ( वय 23) या आरोपीला अटक केली आहे. 

कल्याण पश्चिमेत उंबर्डे गावात  रिक्षा चालक अभिमान भंडारी (वय 51) याची पहाटेच्या सुमारास धारदार शस्त्रने हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. या हत्येमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत हत्या का व कोणी केली याचा तपास सुरू केला.

कल्याण: रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी एकाला अटक, 24 तासात आरोपी गजाआड!
डिसले गुरुजी बनले 'डॉक्टर'; 'या' विद्यापीठाकडून मानद पदवीने सन्मान!

अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी या हत्येचा छडा लावला. अभिमान याची हत्या करणाऱ्या सोपान पंजे या आरोपीला पोलिसांनी अटक केली. अभिमान हा पंजे याच्या घरात सारखा डोकावून पाहायचा याचा सोपान याला राग येत असे. दरम्यान सोपान ने अनेकदा अभिमानला समज दिली होती. मात्र तो ऐकत नसल्याने सोपान याने अभिमान भंडारी याची हत्या केली.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com