अखेर त्या ठेकेदाराला २५ हजाराचा दंड; साम टीव्हीचा दणका

बातमीची दखल घेत पालिका प्रशासनाने संबधित ठेकेदाराला निष्काळजी पणाचा ठपका ठेवत २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
अखेर त्या ठेकेदाराला २५ हजाराचा दंड; साम टीव्हीचा दणका
Kalyan Saam TV

कल्याण : कल्याण (Kalyan) डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मोठ्या नालेसफाईचे काम सुरु आहे. मात्र नाल्यातील गाळ बाहेर काढून बाहेर काढण्याऐवजी तो गाळ नाल्यातील पाण्यातच फेकत असल्याचा व्हिडिओ सर्वात प्रथम साम टिव्हीने दाखवला होता. या बातमीची दखल घेत पालिका प्रशासनाने संबधित ठेकेदाराला निष्काळजी पणाचा ठपका ठेवत २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Kalyan
भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवून जिंकू शकते: चंद्रकांत पाटील

कल्याण (Kalyan) पश्चिमेकडील रामबाग नाल्यातील गाळ काढण्यात आल्यानंतर संध्याकाळी नालेसफाई करणाऱ्या कामगारांनी नाल्याच्या कडेला असलेला गाळ पुन्हा नाल्यातील पाण्यात फेकल्याचा व्हिडिओ मनसे पदाधिकारी कपिल पवार यांनी व्हायरल केला होता. नाल्यातील गाळ बाहेर काढून पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाला मार्ग मोकळा करून देण्यासाठी नालेसफाई केली जात असून, यासाठी महापालिका कोट्यवधी रुपयाचा खर्च करते. मात्र ठेकेदाराकडून निष्काळजी पणा केला जात होता. नाल्यातील गाळ पुन्हा नाल्यातच टाकला जात होता. दरम्यान ही बातमी सर्वात प्रथम साम टिव्हीने दाखवली. अखेर  बातमीची दखल घेत पालिका प्रशासनाने संबधित ठेकेदाराला निष्काळजी पणाचा ठपका ठेवत २५ हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.

Kalyan
Sex Work In India: 'सेक्स वर्क'ला व्यवसाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

दरम्यान पालिका प्रशासनाने या नालेसफाई मधील हातसफाईची तत्काळ दखल घेत संबधित नालेसफाईची पाहणी केली. यावेळी नालेसफाईचे काम करणाऱ्या कामगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुपरवायजर नसल्याचे दिसून आल्याने प्रशासनाकडून संबधित ठेकेदारावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्याला २५ हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. हा दंड ठेकेदाराच्या अनामत रकमेतून वसूल केला जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com