कल्याण PWD विभागाचा अभियंता ACBच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडले

अविनाश भानुशाली अस अभियंत्याच नाव आहे.
कल्याण PWD विभागाचा अभियंता ACBच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडले
कल्याण PWD विभागाचा अभियंता ACBच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडलेSaam Tv

प्रदिप भणगे

कल्याण पीडब्ल्यूडी विभागाचे अभियंता ठाणे एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. एक लाखांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडले आहे. अविनाश भानुशाली अस अभियंत्याच नाव आहे. कल्याण रायते या गावातील बाधित बांधकामाचे मूल्यांकन देण्यासाठी एक लाखांची लाच मागितली होती. अविनाश भानुशाली हे सार्वजनिक बांधकाम विभाग, कल्याण येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

कल्याण PWD विभागाचा अभियंता ACBच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडले
राजीव सातवांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक; 'या' नेत्यांची नावं चर्चेत

तक्रारदारांच्या मालकीच्या जमीनीवरील बांधकाम हे मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे भुसंपादनात जात असल्याने सदर बांधकामांचे मुल्यमापन करुन अहवाल देण्यासाठी लोकसेवक याने दि . ९/९/२१ रोजी पडताळणी दरम्यान यापूर्वी ४ लाख स्विकारल्याचे मान्य करुन आणखी १ लाख रकमेच्या लाचेची मागणी करुन त्याशिवाय अहवाल मिळणार नाही असे सांगितले. त्यावरुन आज सापळा कारवाई दरम्यान लोकसेवकाने स्वत: चे कल्याण येथील कार्यालयात १ लाख रु लाच रक्कम स्विकारल्यावरुन रंगेहाथ पकडले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com