Kalyan: चाकूचा धाक दाखवत प्रवाशाला लुटले, कल्याण रेल्वे पोलिसांनी चोरट्याला अवघ्या दोन तासात पकडले

कल्याण रेल्वे पोलिसांनी केवळ वर्णनावरुन शोध घेत या चोरट्याला अवघ्या दोन तासात अटक केली आहे.
Kalyan: चाकूचा धाक दाखवत प्रवाशाला लुटले, कल्याण रेल्वे पोलिसांनी चोरट्याला अवघ्या दोन तासात पकडले
Kalyan Railway Police Saam Tv

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात पहाटेच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून एका प्रवाशाचा मोबाईल लुबाडल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात घडली होती. या प्रकरणी प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती (Kalyan Railway Police Arrest Mobile Thief In Just Two Hours).

Kalyan Railway Police
Video : मोबाईलची चोरी अशीही होऊ शकते, फोन वर बोलत जात असाल तर सावधान!

कल्याण रेल्वे पोलिसांनी (Kalyan Railway Police) केवळ वर्णनावरुन शोध घेत या चोरट्याला अवघ्या दोन तासात कल्याण (Kalyan) बैलबाजार परिसरातून अटक केली आहे. मोनू चाळके असं या आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसानी सांगितले आहे.

दरम्यान, या चोरट्यांकडून पोलिसांनी चाकू आणि चोरीला गेलेला मोबाईल (Mobile) हस्तगत केला आहे. अटक केलेला मोनू चाळके हा अंबरनाथ येथील रहिवासी असून त्याच्या विरोधात आधी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com