कल्याण: चोरीच्या बाईकनेच करायचा चोरी! कोळसेवाडी पोलीसांनी आवळल्या मुसक्या...

आतापर्यंत कल्याण-डोंबिवली भिवंडी, ठाणे, मुंबई याठिकाणी देखील चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
कल्याण: चोरीच्या बाईकनेच करायचा चोरी! कोळसेवाडी पोलीसांनी आवळल्या मुसक्या...
कल्याण: चोरीच्या बाईकनेच करायचा चोरी! कोळसेवाडी पोलीसांनी आवळल्या मुसक्या...प्रदीप भणगे

कल्याण: कल्याण कोळशेवाडी पोलीसांनी एका सराईत चोरट्याला सापळा रचत अटक केली आहे. अलिहसन जाफरी असं या चोरट्याचं नाव आहे. 22 वर्षीय आलिहसन हा सराईत गुन्हेगार आहे. चैन स्नेचिंग व दुचाकी चोरी (Bike Theft) मध्ये त्याचा हातखंडा आहे. चैन स्नेचिंग करण्यासाठी तो आधी महागड्या दुचाक्या चोरायचा त्यानंतर या चोरलेल्या दुचाकीवरून चैन स्नेचिंग (Chain Snacthing) करायचा व ही दुचाकी रस्त्यात उभी करून तेथून पळ काढायचा. (Kalyan: Steal with a stolen bike! kolsewadi police arrested the theft)

हे देखील पहा -

गेल्या काही दिवसांपासून कल्याण (Kalyan) कोळशेवाडी (Kolsewadi) परिसरात चैन स्नेचिंग, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी पोलिसांनी चार पथके नेमली व या चोरट्यांचा शोध सुरु केला. खबऱ्यांमार्फत त्यांना अलीहसन हा आंबिवली इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आंबिवली इराणी वस्तीत सापळा लावून अलीहसनला अटक केली आणि त्याच्याकडून पाच मोटरसायकल, तीन साखळ्या 4, लाख 53 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

कल्याण: चोरीच्या बाईकनेच करायचा चोरी! कोळसेवाडी पोलीसांनी आवळल्या मुसक्या...
देशीस २, विदेशीसाठी ५ रुपयांत मद्य परवाना घ्या; कारवाई टाळा

आतापर्यंत कल्याण-डोंबिवली भिवंडी, ठाणे, मुंबई याठिकाणी देखील चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यान कल्याण नजीकच्या आंबिवली येथील इराणी वस्तीतून याआधी देखील अनेक सोनसाखळी चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. अलीहसनच्या अटकेनंतर ही वस्ती पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com