मुंब्य्रात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कंगनाच्या फोटोला काळे फासून निषेध!

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नसून ते 2014 मध्ये मिळाल्याचे विधान केल्यानंतर पुन्हा महात्मा गांधींवर विधान केले.
मुंब्य्रात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कंगनाच्या फोटोला काळे फासून निषेध!
मुंब्य्रात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कंगनाच्या फोटोला काळे फासून निषेध!कल्पेश गोरडे

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नसून ते 2014 मध्ये मिळाल्याचे विधान केल्यानंतर पुन्हा महात्मा गांधींवर विधान केले. या सर्व गोष्टींचा निषेध करत ठाण्यातील मुंब्रा येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिलांनी कंगना राणावतच्या विरोधात आज मुंब्रा पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन केले. यावेळी कंगना राणावतच्या फोटो ला काळ फासून "गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है.." अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.

हे देखील पहा :

JNU मधील विद्यार्थी किंवा इतर कोणी फंडामेंटल राईट्स मध्ये अशी विधान केल्यानंतर त्यांना 18 महिने जेल होते. त्यांच्यावर देशद्रोह किंवा UAPA कलम लावले जातात आणि कंगना राणावत खुले आम सगळ्यांसमोर कधी मुख्यमंत्र्यांवर टीका करते. कधी भारताच्या स्वातंत्र्यावर बोलते तर कधी महात्मा गांधीं विरोधात विधान करते.

मुंब्य्रात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कंगनाच्या फोटोला काळे फासून निषेध!
नंदुरबार, शहरातून जवळपास साडेचार लाखांचा तंबाखू युक्त गुटखा जप्त!

महापुरुषांबाबत आणि देशाच्या स्वातंत्र्याबाबत बेताल वक्तव्ये करून देखील तिला वाय प्लस (Y+) सिक्युरिटी दिली जाते. कंगना राणावत च्या हिशोबाने 2014 मध्ये जी स्वातंत्र्य मिळाले आहे. फक्त निगेटिव्ह गोष्टींसाठी मिळालेली आझादी असल्याचा आरोप करत कंगना ही पद्मश्री पुरस्कारासाठी पात्र नसून तो तिने परत करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका विरोधी पक्षनेते अशरफ शानु पठाण यांची कन्या मर्जिया शानु पठाण यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com