सेक्स रॅकेट चालवणारा फिल्म प्रोड्युसर पोलिसांच्या ताब्यात

मीरा रोड परिसरातून एका फिल्म प्रोड्युसरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सेक्स रॅकेट चालवणारा फिल्म प्रोड्युसर पोलिसांच्या ताब्यात
सेक्स रॅकेट चालवणारा फिल्म प्रोड्युसर पोलिसांच्या ताब्यातSaam Tv

भाईंदर -  प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्राला Raj Kundra पोलिसांनी डर्टी पिक्चरसाठी अटक केल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक धक्कादायकक बातमी समोर आली आहे. मीरा रोड परिसरातून एका फिल्म प्रोड्युसरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सेक्स रॅकेट प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत फिल्म प्रोड्युसरसह त्याच्या साथीदाराला अटक केली.

या प्रकरणी त्याच्यासोबत असलेल्या एका साथीदाराला देखील पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. फिल्म प्रोड्युसर कनय्यालाल भालछंदांनी Kanyalal Balchandani आणि त्याचा साथीदार परमानंद भालछंदांनी अशी या आरोपींची नाव आहे.

हे देखील पहा -

प्राप्त माहितीनुसार, तरुणींना फिल्ममध्ये काम देतो असे बोलून तरुणींना भुलवायचा आणि त्यांकडून देहव्यापार सुरूअसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबतची गुप्त माहिती मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम ब्रांच   युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेश बदलून या प्रकरणाची खात्री केली त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.

सेक्स रॅकेट चालवणारा फिल्म प्रोड्युसर पोलिसांच्या ताब्यात
दारुड्या पत्नीचा पतीनेच केला खून!

याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आली असून दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी साठी पाठवण्यात आले आहे. पुढील तपास सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com