माजी आमदार विवेक पाटील यांना ‘ईडी’चा पुन्हा दणका; मालमत्ता विक्रीवर घातली बंदी

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे
माजी आमदार विवेक पाटील यांना ‘ईडी’चा पुन्हा दणका; मालमत्ता विक्रीवर घातली बंदी
Vivek PatilSaam TV

नवी मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील (Vivek Patil) यांना आज ईडीने (ED) पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. विवेक पाटील यांच्या यांच्या मालमत्ता विक्रीवर ईडीने बंदी घातली आहे. कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी (karnala bank fraud) ईडीने ही कारवाई केली आहे. बँक फसवणूक प्रकरणात वर्षभरापासून विवेक पाटील हे सध्या ईडीच्या ताब्यात आहे. विवेक पाटील यांच्यावर 67 बनावट खात्यांच्या माध्यमातून 560 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. (Karnala Bank Fraud Vivke Patil Latest News)

Vivek Patil
दीड वर्षात १० लाख जणांना नोकऱ्या देणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

चार वेळा आमदार आणि कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष राहिलेल्या विवेक पाटील यांना यापूर्वी सुद्धा ईडीने दणका दिला होता. विवेक पाटील यांची तब्बल 234 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता यापूर्वी ईडीने जप्त केली होती. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमद्ये कर्नाळा क्रीडा अकादमी आणि अनेक अन्य ठिकाणच्या भूखंडांचा समावेश होता.

Vivek Patil
'भारत सरकारने मुस्लिम धर्मियांची माफी मागावी अन्यथा...'; ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक

दरम्यान, कर्नाळा बँकेच्या 560 कोटींच्या घोटाळा प्रकरणात विवेक पाटील यांना जून 2021 मध्ये ईडीने अटक केली होती. मुंबई ईडी झोन-2 चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी त्यांच्या निवासस्थानावरून पाटील यांना अटक केली होती. राज्य शासनाचे गृहखाते अटकेची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तीन महिन्यांपूर्वी पनवेल संघर्ष समितीने ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशिल कुमार यांच्याकडे लेखी कैफियत मांडली होती. त्यानुसार त्यांना अटक झाली होती.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com