Karuna Sharma News: 'मी कायद्यानुसार कोट्यवधी रुपयांची मालकीण...;करुणा शर्मा यांचा धनंजय मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप

Karuna Sharma On Dhananjay Munde: करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते, आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Karuna Sharma News
Karuna Sharma NewsSaam tv

सचिन गाड

Mumbai News : करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते, आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'मी ब्लॅकमेकलर आहे की धनंजय मुंडे ब्लॅकमेलर आहेत याचे कागदपत्रे देईल. मी कायद्यानुसार कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे, असं म्हणत करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आणखी आरोप केले आहेत. (Latest Marathi News)

करुणा शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले. करुणा शर्मा म्हणाल्या, निवडणुकीच्या प्रतिज्ञेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर माहिती लपवली आहे . आजपर्यंत कोर्टाच्या ऑर्डरमुळे गप्प होते. कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात देखील खोटी माहिती दिली. धनंजय मुंडे यांचं नाव मी सगळ्या कागदपत्रात लावते. 1998 पासून आम्ही एकत्र असून 2004 पासून लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होतो'.

Karuna Sharma News
Sharad Pawar On Girish Bapat Demise: झुंझार नेता हरपला! विरोधकांनाही अश्रू अनावर; राज ठाकरे, शरद पवारांनी दिल्या भावूक प्रतिक्रिया

'माझ्या 1 कोटी रुपयांच्या पॉलिसीमध्ये देखील धनंजय मुंडे हे नॉमिनी आहेत. माझ्या पासपोर्टमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आहे आणि माझ्या मुलांच्या जन्म प्रमाणपत्र आणि आधारकार्डवर देखील धनंजय मुंडे यांचं नाव आहे. धनंजय मुंडे यांच्या स्वतःच्या २ कोटी रुपयांच्या पॉलिसीवर देखील माझं नाव बायको म्हणून आहे. मी त्यावर नॉमिनी आहे,आमचं दोघांचं बँकेत जोडखातं देखील आहे, असेही त्या म्हणाल्या.

'पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र तसेच इतर अनेक कागदपत्रांवर माझं नाव करुणा धनंजय मुंडे असंच आहे. धनंजय मुंडे यांना पक्षातून काढून मागणी केली. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस आणि प्रशासन माझा छळ करत आहे, असेही त्या म्हणाल्या.

Karuna Sharma News
National Anthem Case: राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणी ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का! मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका

'मला सोशल मीडियावर घाणेरडी शिवीगाळ केली जाते. लोकांकडून मला शिव्या घातल्या जातात. २००१ मध्ये माझे दागिने आणि घर विकून हृदयात छिद्र आहे, असं सांगून माझ्याकडून १५ लाख रुपये घेतले. मी मुंडे यांना घटस्फोट देणार नाही. मी ब्लॅकमेलर आहे की धनंजय मुंडे ब्लॅकमेलर आहेत, याचे कागदपत्रे देईल. मी कायद्यानुसार कोट्यावधींची मालकीण आहे, असेही करुणा मुंडे म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com