Kasaba By Election : 'कसबा'साठी पक्षांमध्ये रस्सीखेच, इच्छुकांमध्ये अहमहमिका; आता NCP ने वाढवला ट्विस्ट

Pune Kasaba By Election : कसबा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच, राष्ट्रवादीच्या ९ इच्छुक उमेदवारांची नावे समोर आली आहेत.
kasaba By Election Ajit Pawar NCP Meeting
kasaba By Election Ajit Pawar NCP MeetingSaam TV

Pune Kasaba By Election Update : राज्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील ट्विस्ट आणखी वाढला आहे. भाजप ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करत असतानाच, महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे, तर इच्छुक उमेदवारांमध्ये अहमहमिका सुरू आहे. आता यात राष्ट्रवादी काँग्रेसनं या निवडणुकीसंदर्भात बैठक घेतली. त्यामुळं हा ट्विस्ट आणखी वाढला आहे. (Latest Marathi News)

कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांनी जोरदार 'फिल्डिंग' लावली आहे. कसबा मतदारसंघासाठी तर सर्वच पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे.

भाजपने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तर शिंदे गटानं भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसनं जागा मिळावी असा आग्रह सुरू ठेवला आहे.

kasaba By Election Ajit Pawar NCP Meeting
Pune By-Election: महाविकास आघाडीत मतभेद? कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाची उडी

राष्ट्रवादीकडून ९ इच्छुक उमेदवार

त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसनं कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात बारामतीत बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व इच्छुक उमेदवार पोहोचले होते. त्यामध्ये अंकुश काकडे, रुपाली पाटील, रवींद्र माळवदकर, दीपक मानकर, गणेश नलावडे, शिल्पा भोसले, वनराज आंदेकर, गोरख भिकुळे, दत्ता सागरे ही नावं समोर आली आहेत.

kasaba By Election Ajit Pawar NCP Meeting
Kasba Peth Bypoll Breaking : कसब्याची जागा काँग्रेसकडेच जाणार? कसबा पेठ पोटनिवडणूक!

कसबा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी आग्रही

बारामतीत झालेल्या बैठकीत कसबा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचे दिसून आले. ही जागा राष्ट्रवादीला दिली जावी, असा निर्णय झाला. पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे आजच शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी बोलणार आहेत. काँग्रेस ही जागा मागत असला तरी, आम्हाला उमेदवारी मिळावी अशी इच्छा आहे. उमेदवारी कोणालाही द्या, पण जागा राष्ट्रवादीलाच द्या, असं पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

kasaba By Election Ajit Pawar NCP Meeting
Election Result 2023: विधानपरिषदेचा पहिला निकाल हाती, कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

शिंदे गटाच्या नेत्यांनी मांडली भूमिका

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. कसबा निवडणुकीत युती अभेद्यच राहणार आहे. इथे भाजप लढणार असून, त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे केसरकर म्हणाले.

चिंचवडसाठी अश्विनी जगताप यांनी घेतला उमेदवारी अर्ज

कसबा पोटनिवडणुकीत ट्विस्ट आलं असतानाच, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. भाजपकडून चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com