Kasaba-Chinchwad By Elections : कसबा-चिंचवडमध्ये भाजपचं ठरलं?; अधिकृत घोषणेआधीच चर्चांना उधाण

Kasaba-Chinchwad By Elections : भाजपने अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. पण त्याआधीच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
Kasaba-Chinchwad By Elections News Update
Kasaba-Chinchwad By Elections News UpdateSAAM TV

साम टीम, पुणे

Kasaba-Chinchwad By Elections News Update : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत क्षणाक्षणाला उत्कंठा निर्माण करणाऱ्या घडामोडी घडत आहेत. या दोन्ही मतदारसंघांसाठी पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असतानाच, इच्छुक उमेदवारांकडून 'डाव-प्रतिडाव' टाकले जात आहेत.

दुसरीकडे, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, बंधू शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. तर कसबा पोटनिवडणुकीसाठी शैलेश टिळक यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळं भाजपचे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहेत, असे मानले जात आहे. (Latest Marathi News)

Kasaba-Chinchwad By Elections News Update
Kasaba By Election : 'कसबा'साठी पक्षांमध्ये रस्सीखेच, इच्छुकांमध्ये अहमहमिका; आता NCP ने वाढवला ट्विस्ट

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार असला तरी, प्रत्येक पक्षानं आपापल्या परीनं उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तर ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न भाजपचे प्रयत्न आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.

Kasaba-Chinchwad By Elections News Update
Election Result Live Updates: बच्चू कडू यांच्या उमेदवाराची पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये पिछाडी

अधिकृत घोषणा होण्याआधीच उमेदवारी अर्ज घेतले

चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. पण त्याआधीच चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. तर कसबा पोटनिवडणुकीसाठी शैलेश टिळक यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे भाजपने आपले उमेदवार निश्चित केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीचा बैठकांचा सपाटा

राष्ट्रवादी काँग्रेसनं कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी बैठका घेतल्या आहेत. कसबा आणि आता चिंचवड पोटनिवडणुकीसाठी बैठक झाली. अजित पवार यांच्या उपस्थितीत या बैठका झाल्या. चिंचवड आणि कसबामधून इच्छुक उमेदवारांसोबत या बैठका घेण्यात आल्या आहेत. कसबामधून ९ इच्छुक उमेदवारांची नावे समोर आली आहेत. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com