Video : एकनाथ शिंदेंची फरमाइश अन् आमदार पुन्हा म्हणाले, 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...

Kay zadi kay dongar Viral Video : एकनाथ शिंदेंनी शहाजीबापू यांनी हॉलमध्ये सगळ्यांसमोर बोलवलं आणि सगळ्यांसमोर हा डॉयलॉग पुन्हा बोलून दाखवायला सांगतलं.
Eknath Shinde On kay zadi kay dongar Song
Eknath Shinde On kay zadi kay dongar SongSaam Tv

मुंबई: 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... एकदम ओक्केमधी हाय..' हा डायलॉग (kay zadi kay dongar Viral Video Song) सध्या महाराष्ट्रभर व्हायरल होतोय. शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या फोनकॉल रेकॉर्डिंगमधलं हे वाक्यं आता अजरामर झालंय. त्यांच्या व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याच्या 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... एकदम ओक्केमधी हाय..' या डायलॉगवर अनेक गाणी, मीम्सही बनवली गेली आहेत. हा सगळा प्रकार एकनाथ शिंदेंसह गुवाहाटीतील हॉटेलात थांबलेल्या आमदारांही समजला. मग काय एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शहाजीबापू यांनी हॉलमध्ये सगळ्यांसमोर बोलवलं आणि सगळ्यांसमोर हा डॉयलॉग पुन्हा बोलून दाखवायला लावला, यावेळी नक्की काय गम्मत घडली ते एकदा तुम्हीच पहा.. (Shahajibapu Patil Memes, Video, Songs And Latest News)

पाहा व्हिडिओ -

शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे. अशात महाराष्ट्रापासून दूर असले तरीही मनाने महाराष्ट्रात असलेल्या एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्यासोबतच्या सर्व आमदार महोदयांना या वाक्याची भुरळ पडली नसती तरच नवल होतं. आज सकाळी सगळे आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असता त्यांनी शहाजी बापूंच त्यांनी मनापासून कौतुक केलं. यावेळी शिंदे यांनी बापूंना त्यांचा हा सुपरहीट डायलॉग पुन्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली, तसेच हे वाक्य किती व्हायरल झालय आणि त्याची लोकांनी गाणी तयार केलीत हे देखील दाखवून दिलं.

दुसरीकडे यावर मराठी यूट्यूबर शंतनू पोळे (Shantanu Pole) या तरुणानं शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगला संगीत देत गाणं तयार केलं आहे. हे गाणंही आता सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होतंय. अनेक गाणीही येतायत, शंतनू पोळे या तरुणानं गंमतीशीर गाणं बनवलं आहे. सोशल मीडियारील ट्रेंडवर गाणं बनवणाऱ्या यशराज मुखाटे (Yashraj Mukhate) यांच्याकडून प्रेरणा घेत हे गाणं बनवल्याचं शंतनू पोळे याने आपल्या इंन्स्टाग्रान पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच "या राजकारण्यांच राजकारण तर चालत राहील, आपण आयुष्यातील प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा, हाय का नाय!" असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांना हा फोनकॉल व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर त्यावर मीम्स बनवले जात आहे, यावर टी-शर्टही बनवले जात आहेत त्यामुळे शहाजीबापू पाटील हे सध्या राज्यात चांगलेच ट्रेंडमध्ये आहेत.

हे एकच गाणं नाही तर अशी अनेक गाणी 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... एकदम ओक्केमधी हाय...' या डायलॉगवर बनवली गेली आहेत.

Sajan Bendre New Song 2022 | Kay Dongar Kay Jhadi Kay Hotel Ok Madhi Sagal | काय डोंगर काय झाडी

काय झाडी काय डोंगर काय हॉटेल । Kay Jhadi Kay Dongar Kay Hotel । New Lokgeet । Song By SK Brothers

Kay Zadi Kay Dongar Kay Hatil | Sumedh Jadhav | 2022 Trending Song | Marathi Song 2022 | Lokgeet |

शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांची मूळ ऑडिओ क्लीप

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com