KDMC Potholes: 'दोन दिवसांत खड्डे भरण्याचं काम करा, अन्यथा...'; आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशानंतर प्रशासनात खळबळ

KDMC Potholes: कल्याण डोंबिवली शहरांमध्ये खड्डे भरण्याच्या कामासंदर्भात महापालिका आयुक्तांनी कठोर पाऊल उचलली आहेत.
KDMC News
KDMC News Saam TV

अभिजीत देशमुख

Kalyan Dombivali News:

कल्याण डोंबिवली शहरांमध्ये खड्डे भरण्याच्या कामासंदर्भात महापालिका आयुक्तांनी कठोर पाऊल उचलली आहेत. वारंवार ताकीद देऊन सुद्धा खड्डे भरण्याची कामं संथ गतीने सुरु आहेत. त्यामुळे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दोन दिवसात शहरातील प्रत्येक रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा आदेश दिला. या आदेशनानंतर तसे न झाल्यास ठेकेदाराची बिलं थांबवून दंडात्मक कारवाई आणि संबंधित अधिकाऱ्यांची देखील विभागीय चौकशी होणार असे स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

कल्याण डोंबिवली शहरांमध्ये खड्डे भरणाऱ्या ठेकेदारावर संबंधित अधिकाऱ्यांचा वचक नसल्याचं दिसून येत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवसांत पावसाची देखील शक्यता आहे. त्यामुळे खड्डे वेळेच्या आत भरले न गेल्यास ठेकेदाराची बिलं थांबवून दंडात्मक कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तसेच आयुक्तांनी काम पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची देखील विभागीय चौकशी होणार असल्याचे सांगितले.

KDMC News
Maratha Andolan: मराठा आरक्षणाच्या मुद्द्याची हायकोर्टाने घेतली गंभीर दखल; कोर्टानं राज्य सरकारला काय सांगितलं?

दरम्यान, याआधी देखील अशा प्रकारचे आदेश दिले होते, मात्र काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आयुक्तांच्या या आदेशाला तरी ठेकेदार व संबंधित अधिकारी जुमानतात का हे आता पाहावं लागेल.

KDMC News
Amravati News: नवनीत राणा व रवी राणा यांची पोलीसात तक्रार; युवक काँग्रेसकडून ईडी चौकशीची मागणी

आयुक्तांकडून नाराजी व्यक्त

महापालिका आयुक्त यांनी दिलेल्या सर्व डेडलाईन लांबणीवर गेल्या आहेत. प्रत्येक रस्त्यावर ठेकेदाराचे तीन पथकं खड्डे भरण्याच्या कामासाठी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, एकच पथक कार्यरत असल्याचे दिसून येतेय.

संबंधित अधिकाऱ्यांचा ठेकेदारावर वचक नाही. त्यात संथ गतीने सुरू असलेल्या खड्डे भरण्याच्या कामाबाबत महापालिका आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com