संतापजनक: घरगुती शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने ३ वर्षीय चिमुरडीला दिले काविलत्याने चटके

घरगुती शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षिकेने तीन वर्षाच्या चिमुकलीला काविलत्याने चटके दिल्याची संतापजनक घटना उघकीस आली आहे.
Kharghar Crime
Kharghar Crimeसिद्धेश म्हात्रे

सिद्धेश म्हात्रे -

नवी मुंबई: घरगुती शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षिकेने तीन वर्षाच्या चिमुकलीला काविलत्याने चटके दिल्याची संतापजनक घटना खारघर (Kharghar) येथे उघकीस आली आहे. खारघर सेक्टर 15 मधील घरकुल सोसायटीमध्ये खारघर घरगुती शिकवणी घेणाऱ्या साधना गायकवाड यांनी हा संतापजनक प्रकार केल्याचा आरोप विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी साधना गायकवाड या घरकुल सोसायटीमध्ये घरगुती शिकवणी घेतात. याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका वावरे कुटुंबियाने आपल्या 3 वर्षाच्या मुलीला प्रीप्रायमरी शिकवणीसाठी गायकवाड यांच्याकडे पाठवले होते. गुरुवारी आरोपी शिक्षिकेने (Teacher) या 3 वर्षीय मुलीला घरातील काविलता गरम करून अंगावर चटके दिल्याचा प्रकार घडला.

पाहा व्हिडीओ -

घरी आल्यावर मुलगी रडत असल्याने तसेच चटक्याचे डाग दिसल्याने पालकांनी या घटनेचा जाब विचारत खारघर पोलीस ठाणे (Kharghar Police Station) गाठले. पोलिसांनी विचारल्यावर आरोपी शिक्षिकेने सदर प्रकार घडला नसल्याचे सांगितले. मात्र, शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारले असता सर्व सत्यता समोर आली.

Kharghar Crime
Kalyan: मनसेच्या पदाधिकाऱ्यावर शिंदे गटातील विभागप्रमुखाच्या भावाकडून चाकू हल्ला

याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षिकेविरोधात कलम 324 तसेच ज्यूवेनाईल जस्टीस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितली. या घटनेमुळे पुन्हा एकदा खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांची माजोरी दिसून येत आहे. या आधी देखील खासगी शिकवण घेणाऱ्या शिक्षकांकडून लहान मुलांना बेदम मारहाण करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

Edited By -Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com