विद्यापीठातील क्रीडासंकुलाला खाशाबा जाधव यांचे नाव...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील क्रीडासंकुलाला ऑलम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे नाव देण्यात येणार
विद्यापीठातील क्रीडासंकुलाला खाशाबा जाधव यांचे नाव...
विद्यापीठातील क्रीडासंकुलाला खाशाबा जाधव यांचे नाव... सागर आव्हाड

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील क्रीडासंकुलाला ऑलम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे नाव देण्यात येणार आहे. बुधवारी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर १९५२ च्या उन्हाळी ऑलम्पिकमध्ये पैलवान खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून दिले आहे. १९४८ ते ५३ या काळात जाधव हे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयाचे विद्यार्थी होते.

हे देखील पहा-

क्रीडासंकुलाच्या नामकरणासंबंधी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी प्रस्ताव मांडला होता. त्याला डॉ. व्ही.बी.गायकवाड यांनी अनुमोदन दिले आहे. २७ एकरमध्ये हे क्रीडा संकुल उभारले करण्यात आले आहे. यामध्ये ७० ते ८० क्रीडा प्रकारांची सुविधा या ठिकाणी मिळणार आहे. इनडोअर आणि आउटडोअर खेळांच्या सर्व सुविधा असलेले हे क्रीडासंकुलाचे बांधकाम आता अंतिम टप्यात आले आहे.

विद्यापीठातील क्रीडासंकुलाला खाशाबा जाधव यांचे नाव...
तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या या बड्या नेत्याचे नाव

बालेवाडी या ठिकाणी क्रीडा संकुलानंतर विद्यापीठातील क्रीडा संकुल हे सर्वांत मोठे क्रीडा संकुल राहणार आहे. त्यामध्ये रनिंग ट्रॅक, ॲथलेटिक, टेनिस, खो-खो, कबड्डी, शूटिंग रेंज, बॅडमिंटन आदी सुमारे १०० खेळांचे प्रशिक्षण आता घेता येणार आहे. विद्यापीठाने या क्रीडा संकुलाकरिता सुमारे ५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यातील काही रक्कम विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राप्त झाली आहे, तर काही राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाकडून मिळालेली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com