क्राईम ब्रांच अधिकारी असल्याचे सांगून आयटी व्यवस्थापकाचे अपहरण करत वसुली; दोघांना अटक

Mumbai Crime News : याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्याचे एपीआय चंद्रकांत घार्गे यांच्या पथकाने मिळून कारच्या नंबर प्लेटवरून माहिती काढून दोन्ही आरोपी भावांना अटक केली.
Kidnapping an IT manager claiming to be a crime branch officer
Kidnapping an IT manager claiming to be a crime branch officerसुरज सावंत

मुंबई: आयटी कंपनीच्या मॅनेजरला क्राईम ब्रँच ऑफिसर असल्याचे सांगत त्याचे अपहरण (Kidnap) करून लुटल्याची घटना दिंडोशी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी अपहरण करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. तसेच दिंडोशी पोलिसांनी हुंडाई कारही जप्त केलेली आहे. (Kidnapping an IT manager claiming to be a crime branch officer; two arrested by dindoshi police in mumbai)

हे देखील पाहा -

गोरेगाव ईस्ट इन्फिनिटी आयटी पार्क येथे रवी छोटेलाल जैस्वार (२०) हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. ११ जून रोजी जैस्वार हे कामावरून घरी जात असताना आरोपी हरीश शाडप्पा गायकवाड (२७) आणि चंद्रकांत शाडप्पा गायकवाड (३२) याने रवीची गाडी अडवली. आपण गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून जैस्वार याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत, मारहाण करू लागले. त्यानंतर दोघांनी जैस्वार याला एका एटीएममध्ये नेत त्याच्याकडून जबरदस्ती खात्यावरून २ हजार काढून घेत मारहाण केली. या मारहाणीचाही व्हिडिओ दोघांनी बनवला. तसेच पुढच्यावेळी १० हजार रुपयांची मागणी करत जैस्वारचे एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि आयकार्ड जप्त केले.

Kidnapping an IT manager claiming to be a crime branch officer
मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा; पोलिसाची कॉलर पकडली, VIDEO व्हायरल

या घटनेची माहिती जैस्वारने दिंडोशी पोलिसात धाव घेत, अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्याचे एपीआय चंद्रकांत घार्गे यांच्या पथकाने मिळून कारच्या नंबर प्लेटवरून माहिती काढून दोन्ही आरोपी भावांना अटक केली. मालाड जनकल्याण नगर येथे हे दोघे भाजीपाला आणि फळे विक्री करतात. हे दोघेही बराच काळ मॅनेजरला बनावट अधिकारी दाखवून धमकावत होते, याआधीही काही जणांकडून त्यांनी पोलीस अधिकारी असल्याचे सांगून हफ्ते वसूल केले असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com