Crime: अपहरण, ५० लाखांची खंडणी आणि अॅक्शन; मानपाडा पोलिसांनी आरोपींना फिल्मी स्टाईलने पकडले

Dombivali Crime News: पोलिसांनी फिल्मी स्टाईलने गाडी आणली चार साईडने पोलिसांनी आपल्याकडील बंदुका घेऊन घेराव घातला आणि आरोपींना पकडले.
Dombivali Crime News
Dombivali Crime Newsप्रदीप भणगे

डोंबिवली: डोंबिवली पूर्वेतील (Dombivali) डिलक्स प्लायवुडचे हिम्मत नाहर यांचे अपहरण (Kidnapped) करून आणि खून करण्याची धमकी देऊन ५० लाखाची खंडणी मागणाऱ्या आरोपींना मानपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने शहापूर येथून अटक केली आहे. संजय रामकिशन विश्वकर्मा, वय ३९ वर्षे, रा. डोबिवली पूर्व, संदिप ज्ञानदेव रोकडे वय ३९ वर्षे, रा. डोंबिवली पूर्व, धर्मदाज अंबादास कांबळे वय ३६ वर्षे रा. डोबिवली पूर्व, रोशन गणपत सांवत, वय ४० वर्षे रा. डोबिवली पूर्व अशी आरोपीची नावे असून इकबाल शेख हा आरोपी फरार आहे. (Dombivali Crime News)

हे देखील पाहा -

असा घडला सर्व प्रकार

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिलक्स प्लायवुड या दुकानाचे मालक हिम्मत शेषमल नाहर हे दिनांक ०३/०८/२०२२ रोजी त्यांच्या दुकानात असताना आरोपी संजय विश्वकर्मा याने जुन्या ओळखीने त्यांच्या दुकानात येवून ३ लाख रुपयांचे प्लायवूड खरेदी केले आणि व्यवहाराचे अॅडव्हान्स पैसे एटीएममधून पैसे काढुन देतो या बहाण्याने हिम्मत नाहर यांना दुकानाच्या बाहेर घेऊन एटीएमकडे घेऊन गेला. त्यावेळी त्याने येथील एटीएम बंद आहे, पुढच्या एटीएममधून पैसे काढुन देतो असे बोलून त्यांना एका गाडीमध्ये बसवून त्यांचा मोबाईल आरोपींनी काढुन घेतला आणि अपहरण करुन शहापूर येथील एका खोलीत बांधून ठेवले.

तीन तारखेला रात्रीच ०९:३० वाजता हिम्मत नाहर यांचा पुतण्या जितु नाहर याच्या मोबाईलवर आरोपींचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की, तुमचा काका आमच्या ताब्यात आहे. तो परत पाहिजे असेल तर ५० लाख रूपये तयार ठेवा. आम्ही एका तासात पैसे कोठे जमा करायचे याबाबत कळवतो. त्यानंतर फिर्यादींनी तात्काळ ही खबर मानपाडा पोलीस स्टेशनला कळवली. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ टाम तयार करुन तांत्रिक तपासाद्वारे त्यांना वेगवेगळया ठिकाणी रवाना केली. दरम्यान आरोपींनी जितु नाहर यांना दर तासांनी फोन करून पैसे घेवून वेगवेगळ्या ठिकाणी बोलविले. त्यानंतर आरोपी यांनी जितु नाहर यांना शहापूर तालुक्यातील मुंबई - आगरा रोडवरील गोठेघर गावाचे जवळील बोगद्याचे ठिकाणी पैसे घेवून येण्यास सांगीतले.

Dombivali Crime News
भंडारा-गोंदिया हादरले! मदतीच्या बहाण्याने ३५ वर्षीय महिलेवर ३ जणांनी केले सामुहिक अत्याचार

फिल्मी स्टाईलने आरोपींना पकडले

पोलिसांनी चार टीम तयार करण्यात येवून त्यांना गावातील लोकांच्या पेहरावाप्रमाणे म्हणजे शेतकरी, खाटीक असे व्यवसाय करणारे नागरिक ज्या पद्धतीचे कपडे परीधान करतात त्या पद्धतीने कपडे परिधान करून सदर ठिकाणी पाठविण्यात आले तसेच जितु याला एक पैशांची बॅग तयार करून आरोपींना पैसे देण्यापुर्वी अपहरीत व्यक्तीला ताब्यात देण्याबाबत सुचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे त्याने पैशांची बॅग घेवून बोगदयाजवळ उभा असताना एक झायलो कार सदर ठिकाणी आली. त्यातील व्यक्तींनी पैशांची मागणी केली असता त्याने त्यांच्या काकाला पहिले ताब्यात दया, मग पैसे देतो असे सांगीतले असता त्यांनी गावातील एका घरात त्यास ठेवले असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने पैशाची बॅग देण्यास नकार दिला असता त्यांच्यात  बाचाबाची झाली.

Dombivali Crime News
Sangli: बिबट्याच्या कातड्याची तस्करी; एकाला पोलिसांनी केली अटक

त्यावेळी गाडी पुढे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने गाडी आणली चार साईडने पोलिसांनी आपल्याकडील बंदुका घेऊन घेराव घातला आणि आरोपींना पकडले. त्याची चौकशी केली असता अपरहण केलेल्या हिम्मतला जवळच असलेल्या एका खोलीत ठेवल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे पोलीस पथकाने आरोपीसह गावात जावून आरोपीने दाखवलेल्या घराची पाहणी केली असता, सदर घरामध्ये आणखी एक आरोपी मिळुन आला. तसेच अपहरीत व्यक्ती यास पलंगाला दोरीने बांधुन ठेवले होते. सदर अपहरीत व्यक्तीची योग्य रितीने सुटका करून घेतली आहे. सदर घटनास्थळावरून एक आरोपी अंधाराचा फायदा घेवून पळून गेला.

गाडी आणि मोबाईल केले जप्त

दरम्यान यातील संजय रामकिशन विश्वकर्मा, वय ३९ वर्षे, रा. डोबिवली पूर्व, संदिप ज्ञानदेव रोकडे वय ३९ वर्षे, रा. डोबिवली पूर्व, धर्मदाज अंबादास कांबळे वय ३६ वर्षे रा. डोबिवली पूर्व, रोशन गणपत सांवत, वय ४० वर्षे रा. डोबिवली पूर्व अशा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून असून इकबाल शेख हा आरोपी फरार आहे. तर या प्रकारणात मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र. ५९०/२०२२ भादंवि कलम ३६४(अ), ३८७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी कडून ५,३२,०००/- रु. झायलो कार व ४ मोबाईल जप्त केले आहेत.

Dombivali Crime News
Kolhapur: "चल जिंदगी थोडा और..." Instagramवर स्टेटस ठेवत तरुणाने संपवलं जीवन

आरोपी हे बेरोजगार असल्याने त्यांनी झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने सदर व्यापारी याची सर्व माहिती काढुन त्यांचेकडुन पैसे उकळण्यासाठी सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तर या आरोपींनी शिर्डी ज्यायचे असे सांगून झायलो कार भाड्याने घेतली होती, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी संजय रामकिशन विश्वकर्मा याने यापूर्वी असे अपहरण केल्याचे पोलिसांना संशय आहे, त्याप्रमाणे पोलीस आता तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com