Kalyan News : मानवी वस्तीत सापांचा सुळसुळाट; भक्षाच्या शोधात किंग कोब्रा थेट तेलाच्या कारखान्यात

काल एकूण दोन ठिकाणी साप मानवी वस्तीत आढळून आलेत.
Kalyan News
Kalyan News Pradip Bhanage

Kalyan News : साप म्हटलं की भल्याभल्यांना घाम फुटतो. अशात किंग कोब्रा असेल तर जीव वाचण्याचा काहीच चान्स नाही. सध्या सर्वत्र गुलाबी थंडीची शाल पसरली आहे. त्यामुळे अनेक साप सूर्यप्रकाशाच्या दिशेने बाहेर पडतात. बाहेर आल्यावर भक्षाच्या शोधात अनेकदा ते मानवी वस्तीतही शिरकाव करतात. त्यामुळे साप पाहून माणसांची एकच धांदळ उडते. या घटना सध्या सातत्याने घडत आहेत. काल एकूण दोन ठिकाणी साप मानवी वस्तीत आढळून आलेत.

किंग कोब्राने रहिवाशांना केले हवालदील

पहिली घटना कल्याण (Kalyan) पश्चिमच्या निलकंठ सोसाईटीची आहे. या सोसाईटीत किंग कोब्रा शिरला होता. सुरुवातीला भक्षाच्या शोधात तो गेटजवळ आला आणि नंतर तळमजल्यावर पोहचला. तितक्यात एका महिलेचे त्यावर लक्ष गेले. नंतर महिलेने इतर रहिवाशांना याची माहिती दिली. तसेच सर्पमित्र दत्ता बोंबे यांना बोलावण्यात आले. त्यांनी तेथे पोहचताच शर्थीचे प्रयत्न करून किंग कोब्रा ताब्यात घेतात. मात्र तोवर सर्वच रहिवाशी हवालदील झाले होते.

Kalyan News
KDMC: कल्याण-डोंबिवली मनपात गिफ्टबंदी; आदेशामुळे अधिकाऱ्यांचे धागे दणाणले

७ फुटांचा साप तेलाच्या कारखान्यात

दुसरी घटना ही एका तेलाच्या (Oil) कारखान्यात घडली आहे. इथे ७ फुटांचा एक साप कारखान्यात घुसला होता. भक्षाच्या शोधात या सापाने तेलाचा कारखाना गाठला. इथे त्याला खाण्यासाठी काही मिळाले नाही. मात्र त्याला पाहून कारखान्याचे मालक भयभीत झाले. कारखान्यात बरेच सामान होते. अशात तो साप तेलाच्या यंत्राखाली गेला. त्यामुळे सर्प मित्राला साप बाहेर काढण्यात बरीच कसरत करावी लागली. सापाचे हे दोन्ही व्हिडीओ सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kalyan News
औरंगाबाद महापालिकेच्या कामगार कल्याण विभागात तब्बल अडीच कोटींचा घोळ

दोन्ही सापांना पकडल्यावर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. तसेच वन विभागाला देखील याची माहिती देण्यात आली. सापांचे मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. हवामानात होत असलेला बदल तसेच सध्याची थंडी या कारणाने बिळात, भूगर्भात राहणारे अनेक प्राणी बाहेर येत असतात. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी तेसच, साप दिसल्यास तात्काळ सर्पमित्रांना याची माहिती द्यावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com