उद्धव ठाकरेंच्या 'भाेंग्या' वर उद्या गुन्हा दाखल करणार : किरीट साेमय्या

किरीट साेमय्या हे आज विरार दाै-यावर आले हाेते.
उद्धव ठाकरेंच्या 'भाेंग्या' वर उद्या गुन्हा दाखल करणार : किरीट साेमय्या
Kirit Somaiya Saam Tv

विरार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे प्रवक्ते नव्हे भाेंगा संजय राऊत (sanjay raut) यांनी माझी पत्नी डाॅ. मेघा सौमय्या यांची बदनामी केल्याप्रकरणी उद्या (साेमवार) संपूर्ण कुटुंबासह मुलुंड पाेलीस ठाण्यात (mulund police station) जाऊन तक्रार दाखल करणार असल्याचे आज (रविवार) किरीट साेमय्या (kirit somaiya) यांनी विरार येथे जाहीर केले. (kirit somaiya latest marathi news)

साेमय्या म्हणाले येत्या काळात ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा नंबर लागणार आहे. मग तो मंत्री असो किंवा ठाकरे कुटुंबातील सदस्य. भ्रष्टाचारा केल्यामुळे नंबर तर लागणारच. कोरोना काळात ठाकरे सरकारने केलेला भ्रष्टाचार, १९ बंगल्याचे राजकारण, मनसुख हिरेन व सचिन वाझे यांच्या सुपारी प्रकरणावर भाष्य करत साेमय्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

Kirit Somaiya
Rickshaw Fare: वसईत रिक्षाचे भाडे वाढले; जाणून घ्या नवा दर

संपुर्ण महाराष्ट्रात वसूली आणि सुपारी इतकेच काम या सरकारने केले आहे. नरेंद्र माेदी (narendra modi) यांनी भ्रष्टाचारमुक्त भारत देश करुन दाखविला. इथे मात्र उद्धव ठाकरे सरकारने भ्रष्टाचारयुक्त राज्य करुन दाखविले आहे. या सरकारमधील सर्व घाेटाळे बाहेर काढून त्यांना शासन हाेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे साेमय्यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Kirit Somaiya
चहाविक्रीच्या कपामागील रुपया शिवरायांच्या गडकिल्ले संवर्धनासाठी; राजेंनी केले कष्टक-यांचे काैतुक
Kirit Somaiya
लिलावतीतून बाहेर पडताच नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना दिले Open Challenge
Kirit Somaiya
रेल्वे रुळावर आढळला RTO अधिकाऱ्याच्या वाहन चालकाचा मृतदेह; पाेलीस तपास सुरु

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.