"हिसाब तो देना पडेगा;" रवींद्र वायकरांच्या ED चौकशीवर किरीट सोमय्यांचा निशाणा

सक्तवसुली संचालनालयाने काल शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ८ तास चौकशी करण्यात आली
"हिसाब तो देना पडेगा;" रवींद्र वायकरांच्या ED चौकशीवर किरीट सोमय्यांचा निशाणा
"हिसाब तो देना पडेगा;" रवींद्र वायकरांच्या ED चौकशीवर किरीट सोमय्यांचा निशाणाSaam Tv

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ED) काल शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ८ तास चौकशी करण्यात आली आहे. वायकर हे जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे (Jogeshwari Assembly constituency) आमदार आहेत. त्यांच्या चौकशीमुळे खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेकांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावरुन, महाविकास आघाडीचे नेते ही कारवाई राजकीय (Political) सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप करत आहेत.

हे देखील पहा-

दरम्यान, या कारवाईनंतर भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "हिशोब तर द्यावाच लागणार आहे, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी यानंतर दिली आहे. त्यांनी यासंदर्भामध्ये एक ट्वीट (Tweet) देखील केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे बिझनेस पार्टनर शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी सुरू झाली आहे.

"हिसाब तो देना पडेगा;" रवींद्र वायकरांच्या ED चौकशीवर किरीट सोमय्यांचा निशाणा
Winter Session 2021 : रणनिती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक

मोठ- मोठ्या बिल्डर्सकडून, महापालिका (Municipal Corporation) कंत्राटदारांकडून जो किकबॅक मिळाला आहे, मग तो एफएसआय (FSI), कोणत्या कंपनीतील फ्रॉड या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी, असेही ते यावेळी म्हणाले आहेत. किरीट सोमय्या यांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपावर वायकर यांची चौकशी केल्याचे समजत आहे. वायकर यांनी ईडीकडे (ED) काही कागदपत्रे देखील सादर केली आहेत.

तसेच गरज पडल्यास त्यांना परत चौकशीला बोलावण्यात येऊ शकणार आहे, असेही ईडीच्या सूत्रांकडून यावेळी सांगण्यात येत आहे. दरम्यान, वायकर यांना नेमके कोणत्या प्रकरणामध्ये चौकशीकरिता बोलविण्यात आले होते, हे अद्याप सांगण्यात आले नाही. तर, वायकर यांनी देखील ईडीच्या चौकशीविषयी काही बोलण्यास नकार दिला.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com