संजय राऊत तुमचं मुल्य ५५ लाखांचं : सोमय्यांचा टोला

राऊत साहेब तुमचं मूल्यांकन पंचावन्न लाखांचं आहे. पीएमसी बँकेचे डिपॉझिट तुम्ही चोरलं होतं. तुम्ही आमचं काय मूल्यांकन करणार, असा सवाल विचारत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला
किरीट सोमय्या- संजय राऊत
किरीट सोमय्या- संजय राऊत- Saam Tv

तळेगाव दाभाडे : राऊत साहेब तुमचं मूल्यांकन पंचावन्न लाखांचं आहे. पीएमसी बँकेचे डिपॉझिट तुम्ही चोरलं होतं. तुम्ही आमचं काय मूल्यांकन करणार, असा सवाल विचारत भाजपचे BJP माजी खासदार किरीट सोमय्या Kirit Somaiyya यांनी शिवसेना Shivsena खासदार संजय राऊत Sanjay Raut यांना टोला लगावला आहे. Kirit Somaiyya Targets Sanjay Raut

येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी शिवसेनेच्या नेत्यांना पुन्हा लक्ष्य केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांच्यावर राऊत यांनी टीका केली होती. पाटील यांचे मूल्य सव्वा रुपयाचं आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर सव्वा रुपयांचा मानहानीचा दावा करणार आहे, असं राऊत म्हणाले होते. त्याचा समाचार सोमय्या यांनी घेतला.

किरीट सोमय्या- संजय राऊत
मुंबई बँकेचा अहवाल तीन महिन्यांत सादर करा; सहकार विभागाचा आदेश

सोमय्या म्हणाले, "राऊत यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं मुल्यांकन सव्वा रुपया केलं. अहंकारी राऊत चंद्रकांत पाटलांची किंमत सव्वा रुपया करताहेत. पण प्रताप सरनाईक, रवींद्र वाईकर, अनिल परब असो की हसन मुश्रीफ यांनी सर्वांनी मिळून साडे पाचशे कोटींचा दावा केला आहे. त्याबाबत काय याचं उत्तर राऊत यांनी द्यावं. जेवढा दावा तेवढं त्या व्यक्तीचं मूल्य असं राऊत म्हणतात. अनिल परब यांनी माझ्या विरोधात शंभर कोटींचा दावा केला आहे. मग किरीट सोमय्यांचे मूल्य १०० कोटी आहे का, ते राऊत यांनी स्पष्ट करावं,'' Kirit Somaiyya Targets Sanjay Raut

सोमय्या पुढं म्हणाले, "संजय राऊतांच्या सव्वा रुपयांच्या वक्तव्याला मी भीक घालत नाही. मी या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चेतावणी देतो. या किरीट सोमय्याला दोन डझन नोटीसा पाठवा, प्रवेश बंदी करा नाही तर अटक करा. उद्धव ठाकरे, शरद पवार मी तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. मला कोल्हापूरला जाण्यापासून रोखून दाखवावं. अंबाबाईनं या सर्वांना सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना मी करतो."

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com