मावळात किर्तन महोत्सवाला सुरुवात,  नागरिकांची मोठी गर्दी...

धार्मिक स्थळे खुली झाल्यामुळे आता मावळमधील वडगावमध्ये पोटोबा महाराज देवस्थानच्या वतीने किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मावळात किर्तन महोत्सवाला सुरुवात,  नागरिकांची मोठी गर्दी...
मावळात किर्तन महोत्सवाला सुरुवात,  नागरिकांची मोठी गर्दी...दिलीप कांबळे

मावळ: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षांपासून राज्यातील सर्व पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे बंद होती. मात्र राज्य सरकारने निर्णय घेतला आणि पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळे खुली करण्यात आली. धार्मिक स्थळे खुली झाल्यामुळे आता मावळमधील वडगावमध्ये पोटोबा महाराज देवस्थानच्या वतीने किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या किर्तन महोत्सवाला नागरिकांसह महिलांनी देखील उस्फूर्त प्रतिसाद दिला. (Kirtan Mahotsav begins in Maval, large crowd of citizens)

हे देखील पहा -

या किर्तन महोत्सवात नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावली आहे. रामायणाचार्य पारस महाराज मुथा यांनी कीर्तन सेवा पोटोबा महाराजांचे चरणी अर्पण केली. यावेळी मावळ तालुक्यातील सर्वच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे आता मावळ तालुक्यातील कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे पहायला मिळत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com